धार्मिकता ही मानवी जीवनातील श्रद्धास्थान : अजय चितळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 29, 2020

धार्मिकता ही मानवी जीवनातील श्रद्धास्थान : अजय चितळे

 धार्मिकता ही मानवी जीवनातील श्रद्धास्थान : अजय चितळे

भाजपाच्यावतीने मंदिरे उघडावी यासाठी “दार उघड उद्धवा, दार उघड” हे आंदोलन केले


नगर
: भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यातील बंद असलेले मंदिरे उघडण्यासाठी दार उघड उद्धवा दार उघड हे आंदोलन करण्यात आले. मध्य नगर शहर च्या वतीने मंडल अध्यक्ष अजय चितळे यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मी कारंजा या ठिकाणी हनुमान मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना अजय चितळे म्हणाले की गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना महामारी जगभरात आलेली आहे. अनेक देश कित्येक महिने लॉक डाऊन च्या अवस्थेत होते. आपला भारत देश ही त्यातून सुटू शकला नाही. भारतात सुद्धा मार्च महिन्यापासून लॉक डाऊन करण्यात आलेला होता. लॉकडाउनच्या काळापासून मंदिरे बंद अवस्थेत आहेत. शासनाने सर्व प्रकारचा लॉक डाऊन आता उठवलेला आहे. सर्व व्यवहार सुरळीत पद्धतीने आता सुरू झालेले
आहेत. महसूल गोळा होणे साठी अगदी दारूचे दुकाने हॉटेल्स ही उघडण्यात आलेले आहेत, परंतु मंदिरे आजही बंद अवस्थेतच आहेत. नागरिकांचा देवदेवतांवरचा विश्वास आजही कायम आहे. धार्मिकता ही मानवी जीवनातील श्रद्धास्थान आहे. तरी राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरे उघडावी, यासाठी भाजपाच्यावतीने मंदिरे उघडण्यासाठी “दार उघड उद्धवा, दार उघड” हे आंदोलन करण्यात आले, असे प्रतिपादन भाजपा मध्य मंडल अध्यक्ष अजय चितळे यांनी केले.
भाजपाच्यावतीने राज्यभर बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी “दार उघड उद्धवा, दार उघड" गांधी मैदान येथील हनुमान मंदिर येथे महाआरती करण्यात आली. यावेळी भाजप मध्यमंडल अध्यक्ष अजय चितळे, माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी, उपमहापौर मालनताई ढोणे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, अँड. विवेक नाईक आदी उपस्थित होते.
अजय चितळे पुढे म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे त्यामुळे प्रत्येक जण आपली काळजी घेऊनच आता समाजात वावरताना दिसत आहे, तरीही कोरोनाचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही. मंदिरे उघडी केल्याने त्यात काही फारसा बदल होईल असे वाटत नाही, उलट विज्ञान कितीही पुढे गेले असले तरीही देवदेवतांची ताकद त्यांच्यावरील असलेला विश्वास कोणीही नाकारू शकत नाही. देवदेवतांन वरील श्रद्धेमुळे व दर्शनामुळे मनुष्याला आत्मिक व मानसिक समाधान लाभते. एखादा रुग्ण जर गंभीर असेल आणि
डॉक्टरला सुद्धा त्याची खात्री नसेल तर डॉक्टर सुद्धा शेवटी म्हणत असतो की आम्ही आमचे प्रयत्न केलेले आहेत. आता सर्व देवाच्या हातात आहे. याचाच अर्थ विज्ञान सुद्धा शेवटी देवाकडे येते. अगदी प्रगत असलेले अमेरिका, इंग्लंड यासारख्या देशांमध्ये सुद्धा देवदेवतांची मंदिरे आहेत. त्यामुळे मानवजातीचा संपूर्ण विश्वास देव देवतांवर आहे, म्हणून राज्य शासनाने याबाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन मंदिरे उघडावीत, असे ते म्हणाले. 
यावेळी बोलताना नरेंद्र कुलकर्णी म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेचा धार्मिकतेवर मोठा विश्‍वास व श्रद्धा आहे. मंदिरे उघडण्यासाठी काही नियमावली बनविण्याची आवश्यकता असेल तर नियम सुद्धा बनवावेत. परंतु कोणत्याही परिस्थितीत मंदिरे ही उघडी केली गेलीच पाहिजे यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी मध्ये नगर शहरच्यावतीने या ठिकाणी दार उघड उद्धवा दार उघड हे आंदोलन आम्ही केलेले आहे. शासनाने आता तरी जागे होऊन मंदिरे उघडावीत अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने यापुढील काळात याहीपेक्षा उग्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडण्यात येईल याची राज्य शासनाने दखल घ्यावी. भाजपाच्यावतीने राज्यभर बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी “दार उघड उद्धवा, दार उघड” गांधी मैदान येथील हनुमान मंदिर येथे महाआरती करण्यात आली. यावेळी भाजप मध्यमंडल अध्यक्ष अजय चितळे, माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी, उपमहापौर मालनताई ढोणे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, अंड. विवेक नाईक आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment