घर घर लंगर सेवेच्या वतीने काढा वाटप ः पोलिस प्रशासनाचेही सहकार्य - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 19, 2020

घर घर लंगर सेवेच्या वतीने काढा वाटप ः पोलिस प्रशासनाचेही सहकार्य

 घर घर लंगर सेवेच्या वतीने काढा वाटप ः पोलिस प्रशासनाचेही सहकार्य

मालेगावचा ‘युनानी मन्सुरी काढा’ कोरोनास रोखणार!

असा आहे काढा
  या काढ्यात मुलेठी, उनाब, खाक्सी, गौजबन, खात्मी, खुब्बाजी, सफीस्तान, अडुळसा, उस्तखुडस औषधी आहेत. या प्रत्येकी सहा ग्रॅम घेवून पावडर केली जाते. त्यातील सहा ग्रॅम पावडर उकळून काढा होतो, तो दोन वर्षांपुढील सर्वांसाठी उपयुक्त आहे. याचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही. दिवसातून तो दोनदा घ्यावा लागतो.

एप्रिलमध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरातील रुग्णसंख्या जूनअखेरीस झपाट्याने कमी झाली. यामुळे मालेगाव पॅटर्नइतकीच राज्यभरात तेथील मन्सुरा कॉलेजच्या युनानी काढ्याची जोरदार चर्चा सुरू झाली. हे कोरोनावरील औषध नाही. मात्र, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आहे. थंडी, ताप, खोकला, श्वसनविकार, विषाणूंचा प्रादुर्भाव रोखणार्‍या नऊ औषधींचा हा काढा कोरोनाशी लढण्याचे बळ देणारा ठरला. प्रारंभी मालेगावातील पोलिसांसह कोरोना योद्ध्यांनी याचा वापर केला असून, आता तो राज्यभर पोहचला आहे. कॉलेजच्या माध्यमातून तीन महिन्यात एक लाख जनतेने हा काढा घेतला आहे.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः गवती काढा कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे .मालेगाव धारावी इ ठिकाणी काढ्याचा वापर करण्यात आल्यावर कोरोना रुग्णांची संख्या अतिशय कमी झाली आहे. नगरमध्येही घर घर लंगर सेवेच्यावतीने काढा वाटपाचे नियोजन करण्यात आले असून, कोरोनाला आळा घालण्यात हा काढा उपयोगी पडणार आहे. एक आठवडाभर या काढ्याचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढणार असल्याची माहिती हरजीत सिंग वधवा यांनी दिली.
टाळेबंदी काळात गरजूंना दोन वेळचे जेवण पुरविणार्या गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी काढा वाटपाच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. शहरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असताना नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मालेगावचा युनानी मन्सूरी काढा आणि आयुर्वेद घटकांचे मिश्रण असलेला काढा नागरिकांना मोफत वाटण्यात येत आहे. लंगर सेवेचे सेवादार सकाळी 7:30 ते 9 वाजे पर्यंत शहरातील विविध भागात या काढ्याचे वाटप करीत आहे. हा  काढा रोज सकाळी प्रोफेसर कॉलोनी चौक येथील पराठा हाऊस या ठिकाणी तयार करण्यात येत असून, त्याचे प्रोफेसर कॉलनी चौक, एकवीरा चौक, तारकपूर, मंगल गेट येथे वितरण होत आहे. लवकरच आनंद धाम, स्टेशन रोड, शहरातील इतर प्रमुख भागासह केडगावला वितरित करण्यात येणार आहे.
शहरात वितरीत होणार्‍या काढ्यात मुलाठी, उन्नब, खाक्षी, गौसाबान, खातमी, खुबाझी, सपिस्तान, बार्गे अडुळसा, उस्त्खुद्दुस, तुलसीचा समावेश असून, काढा तयार होताना त्यामध्ये पुदिना, इलायची, गवती चहा, दालचिनी, काळा मीठ, गूळ टाकण्यात येतो. या काढ्याचा अनेक नागरिक लाभ घेत असून, एक सप्ताहसाठी याचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास हे गुणकारी असल्याची माहिती हरजितसिंह वधवा यांनी दिली. हा काढा तयार करण्यासाठी डॉ.सिमरनकौरव वधवा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी लंगर सेवेला अहमदनगर पोलीस दलाचे सहकार्य लाभत आहे. या सेवेत सहभागी होऊन हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी टोनी कुकरेजा, प्रशांत मुनोत, राहुल बजाज, सुनील छाजेड, कैलास नवलानी, दीपक कुकरेजा, हरविंदर नारंग, रामसिंग कथुरिया, पुनीत भूतानी, बलदेव सचदेव, विजय मणी, सुनील थोरात आदी परिश्रम घेत आहे.
जगभरात कोरोना विषाणूचे थैमान वाढले. मात्र, योग्य उपचारपद्धती अभावी संसर्गापासून बचाव करणे एवढेच हाती होते. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात एप्रिलपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. दाटीवाटीची लोकवस्ती असल्याने शहरातील चिंता वाढली. मालेगावच्या मन्सुरा येथे 40 वर्षांपासून मोहम्मदीया टीब्बीया युनानी मेडिकल कॉलेज आहे. संस्थेचे चेअरमन अर्शद मुख्तार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. अबूल इरफान, उपप्राचार्य डॉ. सय्यद मिनहाज, डॉ. अब्दुल मजीद यांच्या टिमने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘युनानी जोशंदा’ अर्थात काढ्याचे फॉर्म्युलेशन केले. आयुष मंत्रालयाच्या गाईडलाईनमधील औषधं यात आहेत. त्याचबरोबर पूर्वीपासून येथे पाच ते सहा औषधी थंडी, ताप, श्वसनविकार अशा आजारांवर वापरली जात होती. कोरोनातील दहा-बारा लक्षणांचा विचार करून संशोधनाअंती महत्त्वाच्या नऊ औषधींचा वापर करून हा काढा तयार करण्यात आला. हा इम्युनिटी बूस्टर काढा सर्वप्रथम मालेगावात तैनात असलेल्या ग्रामीण पोलीस दलातील कर्मचार्यांना देण्यात आला, त्याचे चांगले परिणाम दिसून आले. डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, तहसील, प्रांत कार्यालयातील कर्मचारी, तसेच मुंबई, पुणे पोलिसांना ही पाकिटे दिली. मालेगावसह राज्यभरात हा ‘मन्सुरी काढा’ अल्पावधीतच प्रसिद्ध झाला आहे.

No comments:

Post a Comment