रावसाहेब पटवर्धन यांच्या कार्याची प्रेरणा नगरकरांना सातत्याने राहिल ः सातपुते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 29, 2020

रावसाहेब पटवर्धन यांच्या कार्याची प्रेरणा नगरकरांना सातत्याने राहिल ः सातपुते

रावसाहेब पटवर्धन यांच्या कार्याची प्रेरणा नगरकरांना सातत्याने राहिल ः सातपुते


नगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर
ः भारतीय स्वातंत्र्य चळवळीत नगरचे सूपुत्र असलेले देशभक्त रावसाहेब पटवर्धन यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढात इंग्रज सत्तेविरोधात मोठे आंदोलन करुन भारतीयांमध्ये देशप्रेमाची भावना जागृती केली होती. त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान हे नगरकरांना अभिमानास्पद असेच आहे. त्यांनी सत्तेपासून दूर राहून देशाप्रती केलेला त्याग आपण कधीही विसरु शकत नाही. त्यांच्या कार्याची प्रेरणा नगरकरांना सातत्याने राहिल, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
स्वातंत्र सैनिक रावसाहेब पटवर्धन यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास शिवसेनेच्यावतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, शशिकांत देशमुख, विशाल वालकर, संजय वल्लाकट्टी, संतोष गायकवाड,मयूर मैड आदि उपस्थित होते. उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा यांनी देशभक्त रावसाहेब पटवर्धन यांच्या कार्याने देशात स्वातंत्र चळवळीची भुमी नगर ठरली.  त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील व त्यानंतरचे कार्य नगरकरांच्या कायम स्मरणात राहील. हे कार्य पुढील पिढीला समजावे व्हावे, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गिरिष जाधव आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. अमित सुडके, राजू औटी, मकरंद वाळके आदी उपस्थित होते.  यावेळी मनपाच्यावतीने दुपारी 2 वाजेपर्यंत देशभक्त रावसाहेब पटवर्धन यांच्या स्मृतीदिनाचा विसर पडला, याचा निषेध शिवसेनेच्यावतीने करण्यात आला.


No comments:

Post a Comment