भिंगार बँकेच्यावतीने ना.प्राजक्त तनपुरे यांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2020

भिंगार बँकेच्यावतीने ना.प्राजक्त तनपुरे यांचा सत्कार

 भिंगार बँकेच्यावतीने ना.प्राजक्त तनपुरे यांचा सत्कार

सर्वसामान्यांना आर्थिक सक्षम करण्यात बँकेचे योगदान ः ना.तनपुरेनगरी दवंडी /प्रिंतनिधी

अहमदनगर ः भिंगार अर्बन बँकेस नगर विकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी सदिच्छा भेट दिली असता, त्यांचा  चेअरमन अनिलराव झोडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि.प.सदस्य शरद झोडगे, संचालक नाथाजी राऊत, कैलास खरपुडे, नामदेव लंगोटे, अमोल धाडगे, एकनाथ जाधव, महेश झोडगे, महेश उदावंत आदि उपस्थित होते.
याप्रसंगी ना.तनपुरे म्हणाले, भिंगार बँकेचा नावलौकिक ऐकून होतो, आज प्रत्यक्ष भेट दिली असता, त्याचा प्रत्यय आला. बँकेच्या विकासात स्व.गोपाळराव झोडगे यांचे मोठे योगदान आहे.  आज गरजूंना तातडीने लगणारी आर्थिक मदत ही महत्वाची असते, ती मदत देऊन गरज भागविणे महत्वाचे असते हेच कार्य बँक करत आहे. बँकेने सर्वसामान्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी दिलेले योगदान हे कौतुकास्पद असेच आहे. बँकेने आपल्या कार्याने जिल्ह्याबरोबरच राज्यात नाव कमविले आहे. बँकेची प्रगती अशीच सुरु रहो, याच शुभेच्छा!
याप्रसंगी चेअरमन अनिलराव झोडगे म्हणाले, माजी खासदार बापूसाहेब तनपुरे आणि परिवाराचे भिंगार अर्बन बँकेसाठी नेहमीच सहकार्य राहिले आहे. आज आ.प्राजक्त तनपुरे नामदार झाले ही बँकेच्यादृष्टीने अभिमानास्पद अशीच आहे. त्यांचे कार्य सर्वांनाच परिचित आहे. त्यांचा यशाचा आलेख असाच उंचावत राहो, हीच शुभेच्छा देत आहोत.
तसेच यावेळी भिंगार बँकेच्या चेअरमन पदी अनिलराव झोडगे यांची निवड झाल्याबाद्दल ना प्राजक्त तनपुरे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला
याप्रसंगी कैलास मोकाटे, रघुनाथ झिने, रोहिदास कर्डिले आदि उपस्थित होते. शेवटी नाथाजी राऊत यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment