सर्वसामान्यांचा मसीहा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, August 13, 2020

सर्वसामान्यांचा मसीहा

                सर्वसामान्यांचा मसीहा...


‘भैय्या’ हे एक अजब रसायन. सर्वसामान्यांचा आवाज, गरिबांचा तारणहार व अन्यायाविरोधात पेटून उठून, प्रश्न तडीस लावणारा सर्वगुणसंपन्न नेता. शहरातील काहीही घटना घडो, तेथे सर्वांत पोहोचणारा कोण असेल ते भैय्या.

सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले भैय्या सदैव जनतेचा आवाज बनून राहिले आहे. कोणताही प्रश्न असो, तो प्रश्न सोडविण्यासाठी ते पुढे असायचे. सर्वसामान्य नागरिकांची अडचण सोडविण्यासाठी 24 तास उपलब्ध असणारे भैय्या, रात्री-अपरात्री कधीही मदतीला धावून जायचे आहे.जनतेचे प्रश्न शासन दरबारी व अधिकार्यांकडे काम करून घेण्याची त्यांच्यात धमक होती.  लोकांच्या हृदयावर भैय्यांनी अधिराज्य गाजविले. कुणाचा फीचा प्रश्न, मुलांचे ऍडमिशन, पाणी, गॅसची समस्या,  दाखला न मिळणे, सरकारी कार्यालयात होणारी अडवणूक असे कोणतेही प्रश्न असले की लोक थेट भैय्यांकडे यायचे.आपली कैफियत मांडायचे. त्यांचे सर्व ऐकून अधिकार्यांना सेनास्टाईल भाषेत समजावून सांगत एका चुटकीत प्रश्न सोडविण्याची ताकद होती. त्यांच्या नावाचा अधिकार्यांत दरारा होता.  सामान्यांचे संरक्षण आणि नगरची सुरक्षा हाच माझा श्वास हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. 25 वर्षे भैय्यांनी आमदारकी भूषविली. या काळात जनतेशी असलेली नाळ शेवटपर्यंत तुटू दिली नाही.

मी भाजपमध्ये असताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे शिवसेनेत प्रवेश केला. माझ्यावर त्यांनी उपजिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपविली. वडिलकीच्या नात्याने प्रत्येक गोष्टीत ते मला सतत मार्गदर्शन करीत. लोकांचे प्रश्न कसे सोडवावे, याचा हातखंडा त्यांच्याकडून मी शिकून घेतला. स्व.गोपीनाथ मुंडे साहेबानंतर लोकप्रिय असणारे अनिल भैय्या होते. त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन त्यांनी दाखविलेल्या मार्गावर मी आयुष्यभर चालत राहणार आहे. कोणी सोबत येवो अथवा न येवो, भैय्या यांनी पेटविलेली जनसेेवेची ज्योती कायम तेवत ठेवणार आहे.

आनंदभाऊ लहामगे - उपजिल्हाप्रमुख, शिवसेना


No comments:

Post a Comment