रखडलेल्या वेतनासाठी नगरपरिषद अभियंत्याचा जीव टांगणीला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 8, 2020

रखडलेल्या वेतनासाठी नगरपरिषद अभियंत्याचा जीव टांगणीला

रखडलेल्या वेतनासाठी नगरपरिषद अभियंत्याचा जीव टांगणीला

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीरामपूर ः तब्बल दीड वर्षांच्या रखडलेल्या वेतनासाठी श्रीरामपूर नगरपरिषदेत ठेकेदारामार्फत कामावर राहिलेल्या अभियंत्याचा जीव टांगणीवर लागला आहे. मात्र नगरपरिषद प्रशासनास याबाबत सोयरेसुतक नसल्याने नगरपरिषद नेमकी कर्मचारी,जनतेची काळजी घेण्यासाठी की जिरवण्यासाठी ? असा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषदेत सिव्हिल इंजिनिअर असलेला तरुण काम करत होता. एप्रिल 2018 ते ऑगस्ट 2019 या कालावधीतील या अभियंत्याचे चार लाखांहून अधिक रकमेचे वेतन नगरपरिषदेने थकविले. सदर अभियंत्याने अनेकदा विनवणी करूनही सदर वेतन देण्यात आले नाही. पालिकेच्या प्रमुखांना, प्रशासनास अनेकदा समक्ष भेटूनही वेतन देण्यात न आल्याने अभियंत्यास मानसिक त्रास झाला. अहमदनगर येथील साईदीप हॉस्पिटल तसेच श्रीरामपूरच्या साखर कामगार रुग्णालयात हा अभियंता ऍडमिट होता. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेताना पैसे नसल्याने त्याच्या पत्नीने मुख्याधिकारी, श्रीरामपूर यांना विनंतीपत्र देऊन पगार देण्याबाबत विनंती केली. मात्र तरीही नगरपरिषद प्रशासनास जाग न आल्याने सदर अभियंत्यांच्या पत्नीने पती व मुलाबाळांचे काही बरे वाईट झाल्यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.  लाखो रुपयांची ठेकेदारांची बिले अदा करणार्‍या नगरपालिका प्रशासनाकडे कमचार्‍याचे रखडलेला पगार देण्यासाठी पैसे नाहीत का ? टक्केवारीच्या साठेमारीत एखाद्याचा बळी तर जाणार नाही ना ? असे एक ना अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

No comments:

Post a Comment