श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती धनसिंग भोईटे यांचा राजीनामा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 11, 2020

श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती धनसिंग भोईटे यांचा राजीनामा


श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती धनसिंग भोईटे यांचा राजीनामा





नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनसिंग विठ्ठल भाईटे यांनी गेली साडेतीन वर्षांपासून नामधारी पद सह्यांचे अधिकार नसल्यानेआपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे शुक्रवारी अहमदनगर येथील कार्यालयात दिला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.24/10/2016 रोजी श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गटाचे एकोणीस संचालकापैकी दहा संचालक निवडून आले तर भाजपच्या आमदार बबनराव पाचपुते गटाचे आठ संचालक निवडून आले. आघाडीचे प्रविणकुमार नहाटा हे अध्यक्षपदी तर संजय जामदार उपसभापतीपदी निवड झाली. त्यानंतर सन 2017 मध्ये जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक लागल्यानंतर प्रवीण नहाटा यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी केल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला.तद्नंतर आघाडीचे धनसिंग विठ्ठल भोईटे यांची सभापती म्हणून तर उपसभापती म्हणून तर भाजपचे वैभवदादा पाचपुते यांची निवड करण्यात आली. नहाटा यांची पंचायत समितीच्या निवडणुकीत हार झाल्याने जामदार यांचे उपसभापतीपद गेल्याने अवघ्या पाचच महिन्यात आघाडी धर्म सोडून फितुरी करत भाजपच्या वैभव पाचपुते यांच्याशी हातमिळवणी करत सभापती धनसिंग भोईटे यांचे सह्यांसह सर्व अधिकार काढुन घेत नाममात्र सभापती ठेवले.
विधानसभा निवडणुकीत राजेंद्र नागवडे गट यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आमदार पाचपुते यांना मदत केली यावेळी नागवडेंच्या खंदे समर्थक असलेले भोईटे यांना सह्यांचे सर्व अधिकार देण्याचे ठरले होते. परंतु पाचपुते-नागवडे यांनी दिलेला शब्द पाळल्याने अखेर कंटाळून भोईटे यांनी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे तालुका भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.यामुळे तालुक्यात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

No comments:

Post a Comment