काष्टी येथील धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सह. संस्थेमध्ये लाखोंचा घोटाळा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 11, 2020

काष्टी येथील धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सह. संस्थेमध्ये लाखोंचा घोटाळा


काष्टी येथील धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सह. संस्थेमध्ये लाखोंचा घोटाळा
54 लाख 18 हजार 46 रुपयांची अफरातफर

नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित काष्टी  या पतसंस्थेत 54 लाख 18 हजार 46 रुपयांची अफरातफर झाल्याने संस्थेचे चेअरमन ज्योती रमेश गवळी त्यांचे पती रमेश गवळी मॅनेजर भारत डोईफोडे यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात उपलेखा परीक्षक सर्जेराव जामदार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.
काष्टी येथील धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन ज्योती गवळी त्यांचे पती रमेश गवळी संस्थेचे मॅनेजर भारत डोईफोडे यांनी ठेवीदारांचा विश्वासघात करून संगनमताने ठेवीदारांनी संस्थेकडे जमा ठेवलेल्याठेवीच्या पैशातून ठेवीदारांचा विश्वासघात करून 54 लाख 18 हजार 46 इतक्या रकमेचा अपहार केला म्हणून त्यांच्या विरोधात पोलिसातं शासकीय लेखापरीक्षक सर्जेराव जामदार यांनी तक्रार दाखल केली आहे . शासकीय लेखापरीक्षक जामदार यांना धनश्री महिला पतसंस्थेचे 26 सप्टेंबर 2013 ते 31 मार्च 2018 मुदतीचे लेखापरीक्षण करण्याबाबत आदेश देण्यात आला . यापूर्वीच ही अवसायनात काढली असल्याने अवसायक एस . एम शेलूकर यांनी संस्थेचे दप्तर उपलब्ध करून दिले. त्यानुसार संस्थेचे लेखापरीक्षण 28 फेब्रुवारी 2020 रोजी पूर्ण केले. त्यानुसार संस्थेच्या दप्तरामध्ये बनावट नोंदी घेऊन बनावट कागदपत्र तयार करून ठेवीदारांचा विश्वासघात करून 54 लाख 18 हजार 046 रुपयांची अफरातफर केलेली आहे. 65 रुपयांची ठेवीची रक्कम किदीमध्ये उशिरा जमा करुन व्याजाचे नुकसान केले. 2 लाख 9 5 हजार 9 4 रुपये मुदत ठेवीची रक्कम किर्दीमध्ये उशिरा जमा घेऊन व्याजाचे नुकसान केले. 50 हजार रुपये ठेवीची रक्कम जमा दाखवली नाही. 22 लाख 75 हजार रुपये विना कागदपत्राद्वारे रोखीने कर्ज नावे टाकून अपहार केला लाख 64 हजार रुपये ठेव पावत्यांचीरक्कम जमा घेता अपहार केला लाख 51 हजार रुपये संस्थेच्या चलनाने रक्कम भरणा केलेली असताना ती जमा 100 रुपये विना व्हाऊचर विना बिल रकम घेता अपहार केला. 1 लाख 3 9 हजार रोखीने नावे टाकून अपहार केला.
2 लाख 55 हजार 605 रुपये व्हाऊचरवर सह्या नसताना रक्कम किर्दीमध्ये कमी जमा घेऊन अपहार केला लाख हजार 17 रुपये कर्जदाराची भरणा केलेली रक्कम किर्दीस कमी जमा अपहार केला. 1 लाख हजार 520 रुपये दैनिक ठेव , सेव्हिंग ठेव ठेवीदारांच्या खात्यात रक्कम जमा नसताना जादा रकम अदा केली. 1 लाख 85 हजार 710 रुपये जाणूनबुजून संशयास्पद खर्च किर्दीस रोखीने नावे टाकले, असा 54 लाख 18 हजार 46 रुपयांचा अपहार करण्यात आला.

No comments:

Post a Comment