सावली दिव्यांग संस्थच्यावतीने तहसीलदार अर्चना भाकड यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 22, 2020

सावली दिव्यांग संस्थच्यावतीने तहसीलदार अर्चना भाकड यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

सावली दिव्यांग संस्थच्यावतीने तहसीलदार
अर्चना भाकड यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

नगरी दवंडी/प्रतिनिधीशेवगाव ः भारत देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना या वैश्विक महामारी असतांना अर्चना भाकड (पागिरे) मॅडम यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात तहसीलदार पदावर उत्तमरित्या उत्कृष्ठ प्रशासकीय सेवा बजावली आहे.त्याच प्रकारे शेवगाव तालुक्यात देखील उत्कृष्ठपणे प्रशासकीय काम करत तालुक्यातील दिव्यांग बांधवाना मोफत अंत्योदय योजनेसह पिवळी शिधापत्रिका देत वंचित घटक असलेल्या दिव्यांगांना न्याय देण्याचे काम कर्तव्यदक्ष तहसीलदार अर्चना भाकड मॅडम यांनी केले आहे. तसेच वैश्विक महामारी कोरोना आजारामुळे सामान्य जनतेचे दैनंदिन जीवनमान खालावलेले असतांना त्यांना जीवन जगण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत मासिक अन्न धान्य व्यतेरीक्त मोफत तांदूळ व डाळी वाटप करण्यात येत आहे.
तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्काचे रेशन वेळेत पोहोच होऊन त्यांची उपासमार होऊ नये यासाठी तहसीलदार मॅडम व पुरवठा विभागातील सर्वं अधिकारी कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा नकरता अहोरात्र काम करत आहेत.  सामान्य जनतेला अन्न धान्य वेळेत पोहचवणारे हे देखील खरे कोरोना योध्ये आहेत.सावली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार अर्चना भाकड मॅडम यांच्या सेवेची दखल घेऊन  तहसीलदार अर्चना भाकड यांना सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था अहमदनगर महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन कोरोना योध्या म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
तहसीलदार अर्चना भाकड मॅडम यांना कोरोना योध्या सन्मानीत करतांना सावली दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चाँद शेख,सचिव नवनाथ औटी,सावली दिव्यांग संघटनेचे शेवगाव तालुका उपाध्यक्ष संभाजी गुठे,कार्याध्यक्ष मनोहर मराठे,शहर अध्यक्ष गणेश महाजन,उपाध्यक्ष सुनील वाळके उपस्थित होते.

No comments:

Post a Comment