केव्हीके दहिगाव येथे कृषि संजीवनी सप्ताहाची सांगताकेव्हीके दहिगाव येथे कृषि संजीवनी सप्ताहाची सांगता - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 10, 2020

केव्हीके दहिगाव येथे कृषि संजीवनी सप्ताहाची सांगताकेव्हीके दहिगाव येथे कृषि संजीवनी सप्ताहाची सांगता

केव्हीके दहिगाव येथे कृषि संजीवनी सप्ताहाची सांगताकेव्हीके दहिगाव येथे कृषि संजीवनी सप्ताहाची सांगता


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शेवगाव ः  लोकनेते मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे, कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने यांच्या वतीने कृषि संजीवनी सप्ताहाची सांगता व लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या 18 व्या पुण्यस्मरनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी केव्हीके दहिगाव चे वरिष्ट शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक व त्यांच्या सहकार्‍यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.
ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचा 8 जुलै हा पुण्यस्मरनानिमित्त दिन. त्यांच्याच दूरदृष्टीतून दहिगाव येथे कृषि विज्ञान केंद्राची उभारणी झाली. हे केंद्र शेतकर्‍यांच्या पर्यंत नवीन शेती तंत्रज्ञान कसे जाईल यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र शासन कृषि विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपूर्ण राज्यात  कृषि संजीवनी सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ. कौशिक यांनी केव्हीके द्वारे चालणारे विविध उपक्रम, शेतक-यांठीच्या विविध सोयी सुविधा याबद्दल अवगत केले. सर्वसामान्य शेतकर्‍यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा करून स्वःताचे भले केले तर हिच स्व. मारुतराव घुले पाटील यांना खरी आदरांजली ठरेल असी भावना व्यक्त केली. खरिप हंगामातील पिकातील विविध किडी व रोग याबद्दल केंद्राचे पिक संरक्षण तज्ञ श्री. माणिक लाखे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलतांना निवृत्त पोलीस अधिकारी सर्जेराव घानमोडे म्हणाले लोकनेते घुले पाटील यांनी आयुष्यात राजकारण करण्याऐवजी समाजकारणावर जास्त जोर दिला. कार्यक्रमासाठी दहिगाव - ने विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब मरकड, पांडुरंग मरकड, केव्हीके चे डॉ. सोमनाथ भास्कर, नारायण निबे, प्रकाश हिंगे, प्रकाश बहिरट व दहिगाव परीसरातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बडधे यांनी केले. इंजी. राहुल पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment