रुईछत्तीशीत शेतकर्‍यांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 15, 2020

रुईछत्तीशीत शेतकर्‍यांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

रुईछत्तीशीत शेतकर्‍यांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा


नगरी दवंडी/प्रतिनिधीरुईछत्तीशी ः  नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथे गेल्या महीनाभरापासून युरियाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे, पिकांना उभारी येण्यासाठी युरिया आवश्यक असतो, जवळपास सर्वच पिकांना युरियाचा ढोस दिला जातो, रुईछत्तीशी येथे मठपिंप्री, हातवळण, वडगाव, गुणवडी, अंबिलवाडी, वाटेफळ, साकत तसेच बीड जिल्ह्यातील कोयाळ, सांगवी, पारोडी या गावातील शेतकर्‍यांना खतांचा पुरवठा केला जातो, गावात स्वामी समर्थ आणि भोस कृषी सेवा केंद्र ही दोन दुकाने मोठी आहेत यांच्या दुकानात दररोज शेकडो शेतकरी खतांच्या मागणीसाठी गर्दी करतात,परंतु यांच्या दुकानात युरिया उपलब्ध नाही कारण युरियाचा भयंकर तुटवडा जाणवत आहे.
शेतकरी कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर न ठेवता युरियासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येतात,कालपासून 250 युरियाच्या गोण्या उपलब्ध होत आहेत आणि मागणी करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या हजाराच्या वर आहे त्यामुळे बर्‍याचशा शेतकर्‍यांना युरियापासून वंचित राहावे लागत आहे,पाऊस वेळेवर पडला खरीपाची पिके जोमाने आली परंतू युरिया उपलब्ध होत नसल्याने शेतकर्‍यांचे हाल होत आहेत,येत्या दोन दिवसात युरिया उपलब्ध झाला नाही तर सर्व शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment