राजगृहावरील हल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यावतीने निषेध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 13, 2020

राजगृहावरील हल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यावतीने निषेध

राजगृहावरील हल्याचा रिपब्लिकन पार्टी
ऑफ इंडिया आठवले गट यांच्यावतीने निषेध

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर, मुंबई येथील निवास स्थानाची तोडफोड करणार्‍यांवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी. या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने तसेच उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन दिले आहे.
राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान राजगृह येथे सात जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान मनुवादी प्रवृत्तीच्या हल्लेखोरांनी मोड तोड केली. राजगृहाच्या खिडक्याच्या काचा, आवारातील कुंड्यांची तोडफोड केली. बहुजनांचे प्रेरणास्थान असलेल्या राजगृहाची तोडफोड केल्यामुळे  बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सदर घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी आणि कठोरात कठोर शिक्षा करावी. अन्यथा देशभर तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे, पापाभई बिवाल, प्रदिप भोसले, निलेश जगधने, सुनिल जाधव, अतुल त्रिभूवन, नंदू सांगळे, रूपक साळवे, राजू दाभाडे, सुनिल चांदणे, किशोर अढागळे, तानसेन बिवाल, संतोष दाभाडे, अनिकेत गायकवाड, संदिप विधाटे, उत्तम साळवे, राहुल भांगारे, लक्ष्मण खिलारी, सचिन साळवे आदिंच्या सह्या आहेत

No comments:

Post a Comment