सातत्याने विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम करतो ः झावरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 22, 2020

सातत्याने विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम करतो ः झावरे

सातत्याने विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम करतो ः झावरे
चिंचोली गावातील  अनेक वर्षांपासून  पिंपरकर वस्ती  रस्ता हा  दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा रस्ता डांबरीकरण व्हावा अशी येथील नागरिकांची मागणी होती. या रस्त्याचा कायमच शासन दरबारी  आम्ही पाठपुरावा करत होतो परंतु या रस्त्याची कुणीही दखल घेतली नाही मागील काही महिन्यांपूर्वी गावातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील यांच्या कडे रस्त्याचा प्रश्न  मार्गी लावा अशी विनंती केली या मागणीची तात्काळ दखल घेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून पिंपरकर वस्ती येथील नागरिकांचा अत्यंत  जिव्हाळ्याचा असणारा रस्त्याचा  प्रश्न  झावरे यांनी मार्गी लावलेला आहे.
- सतीश पिंपरकर, माजी सरपंच
- सुधीर पोटे, माजी सरपंच बारादरी.

पारनेर ः आपल्याला मिळालेल्या सत्तेचा विधायक कामासाठी वापर जो करतो त्यालाच लोकप्रतिनिधी म्हणतात फोडाफोडीचे राजकारण करून काही साध्य होत नसते विधायक कामांकडे लक्ष देणे गरजेचे आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध गावांमध्ये  कोट्यावधी रुपयांचे कामे केली असून यापुढील काळात तालुक्यातील प्रलंबित कामांसाठी आपण सदैव प्रयत्न करणार  असून तालुक्यात विकास कामांचा कधीही  खंड पडू देणार नाही आम्ही  सातत्याने विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत आहोत असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित राव झावरे पाटिल यांनी व्यक्त केले आहे.
पारनेर तालुक्यातील चिंचोली येथे  डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत नियोजन मंडळाच्या माध्यमातून मळाई देवी मंदिर ते पिंपळकर मळा रस्त्याकरिता झावरे यांच्या प्रयत्नातून 15 लाख रुपये मंजूर झाले आहेत  त्या  रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी चिंचोली गावचे मा.सरपंच सतीश पिंपरकर, वडनेर हवेलीचे सरपंच लहूशेठ भालेकर, लोणी मावळा गावचे उपसरपंच शेंडकर, प्रदीप गाडे, देवीभोयरे गावाचे नेते मंगेश मुळे, जनार्दन भालेकर, देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष विष्णुदादा भगत, सेक्रेटरी आनंदराव पिंपरकर, विश्वस्त गोविंद भगत, उपरपंच बबन भगत, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ भगत, ग्रा.पं.सदस्य गणेश पिंपरकर विश्वनाथ झंजाड, अक्षय  दत्तात्रय घोरपडे, सुधीर सातपुते निनाद पिंपरकर, कैलास पिंपरकर, प्रवीणदादा झंजाड भागचंद झंजाड, रोहिदास चानगुडे, विठ्ठल झंजाड आदींसह गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.

No comments:

Post a Comment