पिकअप चालकाला लुटले; दोन लाखांचा ऐवज लंपास - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 8, 2020

पिकअप चालकाला लुटले; दोन लाखांचा ऐवज लंपास

पिकअप चालकाला लुटले; दोन लाखांचा ऐवज लंपास


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे नेवासा - शेवगाव रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल आडवी लावून दोन लाख रुपयांची लूट केल्याची फिर्याद चालक हरिदया सोपान आहेर (रा.रामज पिंपळस,ता.निफाड) याने नेवासा पोलिस ठाण्यात दिली आहे.
शेवगांव विभागीय पोलिस उपधीक्षक मंदार जवळे,पोलिस निरीक्षक रणजित डेरे,गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक (एम.एच 15 पी.व्ही 2680) या वाहनाचा चालक लातूरहुन नाशिक कडे जात असताना नेवासा तालुक्यातील भेंडा ब्रूद्रुक येथील माऊली दूध संकलन केंद्राजवळ नेवासा - शेवगाव मुख्य रस्त्यावर मंगळवारी (दि.7 रोजी) दुपारी तीन ते साडे तिन वाजेच्या सुमारास पिकअपला अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल आडवी घालून पिकअप थांबवून चालका कडील रोख दोन लाख रुपये व ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेऊन पलायन केले आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.खरोखरच लूट झाली की लुटीचा बनाव निर्माण केला याचा ही तपास पोलिस करीत आहेत.

No comments:

Post a Comment