दलित अल्पवयीन मुलीवर झालेल्या हल्ल्याची सी आई डी मार्फत चौकशी करा ः गायकवाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 14, 2020

दलित अल्पवयीन मुलीवर झालेल्या हल्ल्याची सी आई डी मार्फत चौकशी करा ः गायकवाड

दलित अल्पवयीन मुलीवर झालेल्या हल्ल्याची
सी आई डी मार्फत चौकशी करा ः गायकवाड

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः  नेवासा तालूक्यातील गिडेगांव येथील दलित अल्पवयीन मुलीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची सखोल चौकशी करुन खर्‍या गुन्हेगाराचा शोध लावण्याच्या मागणीसाठी  शुक्रवार (दि.17) रोजी दुपारी बारा वाजता नेवासा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढणार आसल्याचे युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी नेवासा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
नेवासा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात रिपाईनेते गायकवाड यांनी म्हटले आहे की, गिडेगांव येथील दलित अल्पवयीन मुलीच्या जीवघेण्या हल्ल्याच्या तपासाबाबत पोलिसांना अपयश आल्याने पिडीत मुलीला योग्य न्याय मिळालेला नसून या प्रकरणाचा तपास सी.आय.डी. मार्फत करावा अशी मागणी यावेळी निवेदनात केली आहे.
कोरोना संसर्ग रोगाची काळजी घेण्यासाठी शासनाच्या आदेशाच्या पालन करुन सुरक्षित अंतर ठेवून मास्क व सॅनियझरचा वापर करुन दलीत अल्पवयीन मुल्लीच्या न्यायहक्कासाठी आंबेडकरी चळवळीतील भिम सैनिक मोर्च्यात सहभागी होणार आसल्याचे यावेळी अशोक गायकवाड यांनी सांगितले. यावेळी रिपाईचे तालूकाध्यक्ष सुशिल धायजे,घटनापती युवा प्रतिष्ठाणचे संस्थापक रवी भालेराव, इंदिरा काँग्रेस (एस.सी) विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण साळवे,राजेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment