कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने दोन शेतकर्‍यांची आत्महत्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 8, 2020

कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने दोन शेतकर्‍यांची आत्महत्या

कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने दोन शेतकर्‍यांची आत्महत्या


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने कर्जत तालुक्यातील नागापूर येथील गणेश निंबोरे या शेतकर्‍याने तर डोंबाळवाडी येथील साहेबराव शिंदे या  शेतकर्‍याने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जत तालुक्यातील दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्जत तालुक्यातील नागापूर येथील गणेश चंद्रकांत निंबोरे वय 32 या शेतकर्‍याने आज सकाळी नऊ ते दहा चे सुमारास आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली त्याच्या मागे  वयोवृद्ध आई, पत्नी, तीन लहान मुली असा परिवार असून दोन ते तीन एकर जमीन असलेल्या या अल्पभूधारक शेतकर्‍याला काही दिवसापूर्वी कांद्याने दगा दिला होता. 
बाजारात नेलेल्या कांद्याला दोन ते तीन रुपये भाव मिळाल्याने गणेश निंबोरे हा गेली काही दिवस आर्थिक विवंचेनेमुळे टेन्शन मध्ये होता, घरची परिस्थिती हलाकीची, आईचे सततचे आजारपण, घरात तीन मुली अशा सर्व बाजूंनी अडचणी समोर दिसणार्‍या या शेतकर्‍याने अखेरीस गळफास घेऊन या जगाचा निरोप घेतला. या शेतकर्‍याचा चुलत भाऊ हनुमंत चंद्रकांत निंबोरे हे शेतात खुरपण्यासाठी जात असताना गणेश याने आत्महत्या केल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी इतरांना बोलावून त्याचा मृतदेह खाली घेतला. उपसरपंच सचिन निंबोरे व इतरांच्या मदतीने कर्जत येथे आणले,  उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे त्याचे शवविच्छेदन डॉ सुचेता यादव यांनी केले. पो कॉ गर्जे यांनी पंचनामा केला. या कुटुंबास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.
डोंंबाळवाडी येथील साहेबराव तात्या शिंदे या 65 वर्षीय शेतकर्याने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली, त्याचे मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार असून ते सकाळी चहा पिऊन आंघोळ करून आपल्या शेतात गेले. काही वेळाने त्याचे बंधू शेतात गेले असता साहेबराव  शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याच्या लक्षात आले असता त्यांनी याबाबत इतर लोकांना माहिती दिली व मृतदेह खाली उतरवला, त्याचा मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला व शवविच्छेदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment