संकटाच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासावी : आ. अरुणकाका जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 22, 2020

संकटाच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासावी : आ. अरुणकाका जगताप

संकटाच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासावी : आ. अरुणकाका जगताप
वर्षा उद्योग समूह व आदित्य सेल यांच्यावतीने 1000 पीपी कीटचे वाटप


नगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरात कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी तितकीच महत्त्वाची आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे कोरोना योद्धा आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी तितकच महत्त्वाची आहे. यासाठी वर्षा उद्योग समूह व आदित्य सेल एमआयडीसी अहमदनगर यांच्या वतीने बुथ हॉस्पिटल व आयुर्वेदीक कोरोना सेंटर येथे 50-50 पी पी कीटचे वाटप करण्यात आले आहे. वर्षा उद्योग समूह व आदित्य सेल यांचा आदर्श इतरांनी घेऊन कोरोना संकटावर मात करण्यासाठी सहकार्य करावे, असे प्रतिपादन आ. अरुणकाका जगताप यांनी केले. वर्षा उद्योग समूह व आदित्य सेल एमआयडीसी अहमदनगर यांच्या वतीने बुथ हॉस्पिटल व आयुर्वेदीक कोरोना सेंटर येथे 50-50 पी पी कीटचे वाटप करताना आ. अरुणकाका जगताप. समवेत आ. संग्राम जगताप, माजी नगरसेवक अँड. धनंजय जाधव, निखिल लुणिया, आदित्य गुजराथी, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, निखिल वारे, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, कमलेश चंगेडिया, राजेश गुगळे, प्रताप काळे, अजय पोटे, राहुल मुथा, धीरज संसारे, आकाश थोरात, महेश महादर, रुपेश येनगुपटला आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अँड. धनंजय जाधव म्हणाले की, कोरोना संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे. आमचे मित्र निखिल लुणिया व आदित्य गुजराथी यांच्या सहकार्यातून बुथ हॉस्पिटल व आयुर्वेद कोरोना सेंटरला प्रत्येकी 50 पीपी कीटचे वाटप करण्यात आले. कोरोना योद्धा हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. आपल्या जीवाची बाजी लावून हजारो कोरोना रुग्णांवर उपचार करुन आनंदाने घरी पाठविण्याचे काम करत आहेत. यासाठी कोरोना योद्धांच्या आरोग्याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेणे गरजेचे आहे. दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन समाजावर आलेल्या संकटामध्ये सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment