दूध अनुदानप्रश्नी दि.1 रोजी भाजपाचे राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 22, 2020

दूध अनुदानप्रश्नी दि.1 रोजी भाजपाचे राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन

दूध अनुदानप्रश्नी दि.1 रोजी भाजपाचे राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन
भाजप पदाधिकार्‍यांच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
नगरी दवंडी /प्रिंतनिधीअहमदनगर ः गाईच्या दूधाला 10 रुपये लिटर अनुदान व दूध पावडरला प्रती किलो 50 रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी भाजपाच्यावतीने राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येणार असल्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात येऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, आ.बबनराव पाचपुते, माजी आ.शिवाजीराव कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, बाळासाहेब महाडिक, रमेश पिंपळे, दादा बोठे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दूधाचे बाजारभाव कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. महाराष्ट्रात 150 लाख लिटर गाईचे दूध उत्पादीत होते. गाईच्या दुधाला प्रती लिटर 10 रुपये अनुदान व दूध भुकटी करीता प्रती किलो 50 रुपये अनुदान तात्काळ मिळावे. शासनाकडून 30 रुपये लिटरने खरेदी व्हावी. तसेच युरिया खताचा तुटवडा असल्यामुळे खत विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत आहे. तसेच शेकर्यांना खते मिळत नसल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांना तात्काळ युरिया उपलब्ध करावा.
वीज वितरण कंपनीने सर्व ग्राहकांना भरमसाठ वीज बिल आकारुन दिले आहेत. शेतकरी व इतर ग्राहकांना विजेचे बिल माफ करावे. तसेच ट्रान्सफारमर तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत, यासर्व न्याय मागण्यासाठी आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव 1 ऑगस्ट 2020 रोजी ‘दूध संकलन बंद’ आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय या ठिकाणी करणार आहोत. तरी आमचे मागण्याचे निवेदन शासनाला तात्काळ पाठवावे, अशी विनंती करण्यात आले आली आहे.

No comments:

Post a Comment