नंदलाल हिरालाल जोशी यांचे निधन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 29, 2020

नंदलाल हिरालाल जोशी यांचे निधन

                     बन्सीमहाराज मिठाईवाले फर्मचे संचालक
     नंदलाल हिरालाल जोशी यांचे निधन
नगरी दवंडी /प्रिंतनिधीअहमदनगर ः नगर व बन्सीमहाराज मिठाईवाले फर्मचे संचालक नंदलाल हिरालाल जोशी ( वय 80 वष ) यांचे  मंगळवार दि. 28 जुलै रोजी सकाळी अल्पशा आजाराने  निधन झाले.अतिशय उत्साही व्यक्तिमत्व असलेले नंदलाल जोशी यांचा शासकीय निमशासकीय कार्यालयातही ऋणानुबंध होता.
त्यांचे मागे भाउ अशोक व राजकुमार जोशी यांच्यासह 1 बहिण ,  1 मुलगा, 4 मुली, सुना,जावई,नातवंडे पतवंडे असा विशाल परीवार आहे. त्यांनी गुरूदत्त संत्संग मंडळ व ज्योतिष्य केंद्राची स्थापना केली होती. गुरूदत्त संत्संग मंडळाअंतर्गत सावेडी जॉगिंग टॅकवर श्री गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या विराट भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहाला मिळालेल्या अभूतपूव प्रतिसादामुळे आध्यत्मिक क्षेत्रात ते चिरकाल स्मरणात राहतील. बन्सीमहाराज मिठाईवाले (अन्नपूर्णा) चे संजय जोशी  यांचे ते वडील होत. जोशी हे गुरुदत्त सत्संग मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ,अर्बन बॅकेचे ज्येष्ठ संचालक व हॉटेल असोसिएशनचे माजी अध्यक्ष, नगर शहर प्रवासी संघटना संस्थापक होते.तसेच शहरातील विविध सामाजिक , आधात्मिक सांस्कृतिक संघटना, संस्थाशी तसेच वारकरी संपद्रायाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.

No comments:

Post a Comment