निगेटिव्ह पॉझिटिव्हच्या चक्रव्युहात सामान्यांचा जीव टांगणीला
श्रीरामपुरात वैद्यकीय गोंधळ
शहर आणि तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये कोरोना रुग्ण सापडत असले तरी त्यांची नेमकी संख्या किती हा महत्त्वाचा प्रश्न गेले चार दिवस तालुक्यात चर्चिला जात आहे . कारण तालुका वैद्यकीय अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी या तिघांमध्ये कोणताही ताळमेळ नसल्याने तसेच खासगी अहवाल वेळेत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे पोहोचत नसल्याने आकडेवारीमध्ये तफावत दिसून येत आहे. कोरोना रुग्णाच्या संख्येबाबत शहरात मोठ्या प्रमाणावर अफवांचे सुद्धा पीक आले असून या भागात दोन लोकांना कोरोना झाला, त्या भागात चार लोकांना कोरोना झाला अशा कपोलकल्पित चर्चा आहेत.
आरोग्य केंद्र असून ताप नसून संताप
नगरपालिकेमार्फत चालवले जाणारे नागरी आरोग्य केंद्र म्हणजे सरकारी दवाखाना ही सध्या शोभेची वस्तू बनली आहे. एकेकाळी नगरपालिकेच्या सरकारी दवाखान्याचा मोठा नावलौकिक होता. त्या ठिकाणी महिलांचे बाळंतपण, आवश्यक तपासण्या, छोटे ऑपरेशन केले जात होते. मात्र सध्या अशा कोणत्याही सुविधा येथे उपलब्ध नाही. फक्त लहान मुलांचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी होते. गर्भवती महिलांना बाळंतपणासाठी शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता धरावा लागतो. मात्र शहरापासून लांब असल्याने बरेच लोक त्या ठिकाणी जाणे टाळतात. नगरपालिकेने स्वतःचे सुसज्ज असे सरकारी रुग्णालय उभारावे. त्याचबरोबर त्याचा विस्तार शहराच्या इतर भागातही करावा अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. इतर प्रश्नांवर पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आरडाओरडा करणारे नगरसेवक सरकारी दवाखान्याच्या प्रश्नावर मात्र गप्प आहेत. याबाबतही शहरातील जनतेत नाराजीची अशी भावना दिसून येत आहे .

No comments:
Post a Comment