श्रीगोंदा तालुक्याचा बारावीचा 91% निकाल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 17, 2020

श्रीगोंदा तालुक्याचा बारावीचा 91% निकाल

श्रीगोंदा तालुक्याचा बारावीचा 91% निकाल

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेतलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेसाठी श्रीगोंदा तालुक्यातून शास्त्र, कला, वाणिज्य आणि व्यवसाय शिक्षण शाखांमधून  3 हजार 305 विद्यार्थी  बसले होते. त्यापैकी 2 हजार 995 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा शेकडा निकाल 90.62 टक्के लागला आहे. श्रीगोंदा तालुक्यात 31 कनिष्ठ महाविद्यालयात  18 शास्त्र शाखा, 22 कला शाखा , 6 वाणिज्य शाखा व एक व्यवसाय शिक्षण शाखा आहे. 18 शास्त्र शाखांपैकी 10 शाखांचा निकाल 100 टक्के लागला असून , सहा वाणिज्य शाखांपैकी दोन शाखांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 90 टक्के पेक्षा जास्त निकाल असणार्‍या एकूण 16 शाखा आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातून इयत्ता 12 वी शास्त्र शाखेमधून 1 हजार 643 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 1 हजार 606 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व शास्त्र शाखेचा निकाल 97.75 टक्के लागला. कला शाखेमधून 1 हजार 154 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी  906 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व कला शाखेचा निकाल 78.51 टक्के लागला. वाणिज्य शाखेमधून 508 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 483 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व वाणिज्य  शाखेचा निकाल 95.08 टक्के लागला. व्यवसाय शिक्षण  शाखेमधून 57 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 48 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व व्यवसाय शिक्षण  शाखेचा निकाल 84.21 टक्के लागला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या सर्व शिक्षकांचे तालुक्यामधून सर्वत्रअभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment