गावठी पिस्टलसह दोन आरोपी जेरबंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 17, 2020

गावठी पिस्टलसह दोन आरोपी जेरबंद

गावठी पिस्टलसह दोन आरोपी जेरबंद
मिरी रोडवरील घटना; शेवगांव पोलीसांची दबंगबाज कारवाई


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शेवगाव ः शेवगांव येथील मिरी रोडवरील हॉटेल सासरवाडी जवळ काल दि .15 रोजी बुधवारी सायंकाळी 5 .30 च्या सुमारास मोटार सायकल वरून आलेल्या दोन इसमांना शेवगाव पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांचे जवळ गावठी बनावटीचा पिस्टल व जिवंत काडतुस (राउंड) मिळून आले, आरोपी सुनिल विजय भाकरे वय 26 वर्षे व पांडूरंग रामकृष्ण वाळके वय 19 वर्षे हे दोघेही नागापुर तालुका अहमदनगर जिल्हा  अहमदनगर येथील असुन त्यांच्याकडून गावठी कट्टा (पिस्टल), जिवंत काडतुसासह (राउंड) मोटारसायकल जप्त करण्यात आले असून आरोपी विरूद्ध शेवगांव पोलीसांत भा.द.वी कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील कामगिरी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह,अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव, पाथर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस नाईक महादेव घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल कैलास पवार , पोलीस कॉन्स्टेबल भनाजी काळोखे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर सिरसाठ ,पोलीस कॉन्स्टेबल संदिप दरवडे यांनी  ही कारवाई केली असुन शेवगांव शहरासह तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असल्याने याविषयी अनेक तर्कविर्तक लावण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment