संजीवनी फौंडेशन सामाजिक चळवळीचा आदर्श : आ.डॉ तांबे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 16, 2020

संजीवनी फौंडेशन सामाजिक चळवळीचा आदर्श : आ.डॉ तांबे

संजीवनी फौंडेशन सामाजिक चळवळीचा आदर्श : आ.डॉ तांबे



नगरी दवंडी/प्रतिनिधी
संगमनेर ः  महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक व राजकीय चळवळीचे मुक्त व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बहुउद्देशीय समाज संघटनेच्या दत्तक झाड करूया वाढ  या राज्यातील सर्वात लोकप्रिय अभिनव उपक्रमाला दिनांक 15 जुलै 2020 रोजी एक वर्ष पूर्ण झाले.
दत्तक झाड करूया वाढ ही अभिनव योजना राज्यातील सर्वात लोकप्रिय संकल्पना म्हणून ओळखली जाते. ही योजना दुसर्‍या वर्षात पदार्पण करत असताना कोरोनाविषाणू चे संकट संपूर्ण जगावर पसरलेले आहे त्यामुळे संजीवनी फाऊंडेशनचे चेअरमन ज्ञानेश्वर सानप यांनी दत्तक झाड करूया वाढ अंतर्गत अंगण तेथे झाड असा कार्यक्रम राबवण्याचे ठरवले. या योजनेच्या दुसर्‍या वर्षाचा शुभारंभ महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पेठ येथे तर नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते संगमनेर येथे तर पारनेर चे लोकप्रिय आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या हस्ते पारनेर येथे तसेच संजीवनी फाउंडेशन चे चेअरमन ज्ञानेश्वर सानप यांच्या हस्ते सोनोशी येथे करण्यात आला. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी संजीवनी फाउंडेशन सामाजिक चळवळीचा मानबिंदू आहे असे म्हटले.
संजीवनी फाउंडेशन चे अभिनव उपक्रम समाजासाठी व सामाजिक चळवळीसाठी आदर्शवत असल्याचे मत  नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ .सुधीर तांबे यांनी मांडले तर दत्तक झाड करूया वाढ ही अभिनव संकल्पना हरितक्रांती साठी आणि वृक्षलागवडीसाठी वरदान असल्याचं आमदार निलेश लंके यांनी म्हटले.

No comments:

Post a Comment