रूईछत्तीसीचा माजी सैनिक बनला मंत्रालय लिपिक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 16, 2020

रूईछत्तीसीचा माजी सैनिक बनला मंत्रालय लिपिक

रूईछत्तीसीचा माजी सैनिक बनला मंत्रालय लिपिक
त्रिसूत्री वर भर द्यावा ः राजू मेहेत्रे
सेवानिवृत्ती नंतर हतबल न होता आयुष्याच्या दुसर्‍या पर्वात यशस्वी होण्यासाठी माजी सैनिकांना त्यांनी त्रिसूत्री वर भर द्यावा असे सांगितले. त्यामध्ये योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि अभ्यासातील सातत्य. आई, वडील आणि पत्नी सौ. जयश्री यांच्या प्रोत्साहनामुळेच त्यांना हे यश संपादन करता आले असल्याचे मेहेत्रे यांनी नगरी दवंडी शी बोलताना सांगितले.



नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील रूईछत्तीसी येथील माजी सैनिक राजू बबन मेहेत्रे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मंत्रालय लिपिक पदी मजल मारली आहे. भारतीय सेनेत त्यांनी 18 वर्षे सेवा केली.मेहेत्रे यांनी  जिल्हा परिषदेच्या रुईछत्रपती येथील शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन श्री ज्ञानेश्वर विद्यालय रुईछत्रपती येथेच माध्यमिक परीक्षा ते उत्तीर्ण झाले. उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी पारनेर येथे पूर्ण केले.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने वेळीच त्यांनी आपली जबाबदारी ओळखून वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी भारतीय सेनेमध्ये ते दाखल झाले. सेनेत त्यांनी सेवेदरम्यान हरियाणा,  पंजाब, नवी दिल्ली, राजस्थान, जम्मू काश्मीर सारख्या खडतर प्रदेशात सेवा करून आपल्या गावचे, तालुक्याचे, जिल्याह्याचे तसेच महाराष्ट्राचे नाव रोशन केले. शांती सेवेसाठी संयुक्त राष्ट्र संघातर्फे त्यांची दक्षिण आफ्रिकेतील काँगो येथे देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य त्यांना लाभले. सेवेदरम्यान त्यांनी आपदा प्रबंधन या विषयात पदोवोत्तर डिप्लोमा करून प्रमानपत्र मिळवले.
भारतीय सेनेत 18 वर्षे सेवा करून त्यांनी निवृत्ती घेतली. आपण या मायभूमीचे काही देणं लागतो आणि त्या उपकाराची परतफेड करण्याची प्रबळ इच्छाशक्ती त्यांना अस्वस्थ करत होती. देशसेवेसोबत समाजसेवा करण्याची जिद्द त्यांना स्पर्धा परिक्षेकडे ओढू लागली. शिरूर जिल्हा पुणे येथे काही दिवस श्लोक करीअर अकॅडमी आणि अँम्बीशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्राथमिक अभ्यास करून पुणे येथील सदाशिव पेठेत चार महिने कठोर आणि नियोजनबद्द अभ्यास करत असतानाच तलाठी ही परीक्षा ते उत्तीर्ण झाले. परंतु आपले ध्येय यापेक्षा उच्च आहे असे मानून त्यांनी अभ्यासिकेत सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत सलग 16 तास अभ्यास करून महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या मंत्रालय लिपिक पदाच्या महाराष्ट्रात माजी सैनिकांच्या अवघ्या 5 जागा असताना प्रथम प्रयत्नातच यशाचे सर्वोच्च शिखर त्यांनी गाठले. त्यासोबत शिक्षण मंडळ पुणे येथे देखील क्लर्क पदी त्यांची निवड झाली आहे.
त्यांना माजी सैनिक बापू चव्हाण, माधव गाजरे, संभाजी चव्हाण, संदेश तानवडे विनोद पडवळ यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच निवडीनंतर माजी सैनिक विलास रसाळ, संतोष सरड, नवनाथ दुर्गे, संतोष खनसे, रायबा सरड, रोहित झाम्बरे यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment