खोटे दागिने ठेवून बँकेची फसवणूक; 25 जणांवर गुन्हा दाखल! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 9, 2020

खोटे दागिने ठेवून बँकेची फसवणूक; 25 जणांवर गुन्हा दाखल!

सावेडी येथील जना स्मॉल फायनान्स बँकेत...
खोटे दागिने ठेवून बँकेची फसवणूक; 25 जणांवर गुन्हा दाखल!
नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः सावेडी येथील जना स्मॉल फायनान्स बँकेमध्ये 25 जणांनी नावावर खोटे दागिने तारण ठेवून बँकेची 22 लाख 20 हजार 300 रुपयांची फसवणूक केली. असल्याचा गुन्हा तोफखाना पोलिसांकडे नोंदविण्यात आला आहे. सोन्याची पडताळणी करून मूल्यांकन करणारे लक्ष्मीकांत देडगावकर सह चोवीस जणांनी बँकेची फसवणूक केल्याची फिर्याद बँकेचे व्यवस्थापक मिलिंद मधुकर आळंदे यांनी दिली असून, तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे व पोलीस नाईक मंगेश खरमाळे करत आहेत. मिलिंद आळंदे यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा सावेडी अहमदनगर येथे डिसेंबर 2019  पासून व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. आमचे बँकेमध्ये सोने तारण कर्ज दिले जाते. तारण ठेवण्यासाठी आलेल्या सोन्याची पडताळणी करून मूल्यांकन करण्याचे काम करण्यासाठी लक्ष्मीकांत भानुदास देडगावकर रा. कापड बाजार अ. नगर यांची दि. 13 जून 2018 पासून नेमणूक केलेली होती.  तेव्हापासून  ते मार्च 2020 पर्यंत लक्ष्मीकांत देडगावकर हे तारण ठेवण्यासाठी आलेल्या सोन्याचे परीक्षण मूल्यांकन करण्याचे काम करीत होते. तारण ठेवण्यासाठी आलेल्या सोन्याचे परीक्षण व मूल्यांकन केल्यावर देडगावकर हे त्याबाबत लेखी प्रमाणपत्र व त्यांनी प्रमाणपत्र दिल्यावरच सोन्यावर कर्ज दिले जात होते. तसेच सोनेतारण कर्ज प्रकरणाचे काम पाहण्यासाठी बँकेने सोनी गुरुप यांची नेमणूक केली होती. तारण ठेवलेले सोने हे बँकेच्या लॉकर मध्ये ठेवले जाते. मार्च 2020 मध्ये सोनी गुरुप यांना देडगावकर यांचे सोन्याचे परीक्षण व मूल्यांकनवर शंका आल्याने त्यांनी मला बोलून दाखविले. मी लागलीच आमचे बँकेचे पुणे येथील प्रात्यक्षिक कार्यालयाचे ऑपरेशन हेड सुमित वाणी यांना कळविले. त्याच वेळेस मी लक्ष्मीकांत देडगावकर यात समक्ष विचारले की, सोने तारण कर्ज प्रकरणांमध्ये काही गडबड आहे का, असल्यास सांग नाहीतर बँक पोलीस केस करील तुला पण त्रास होईल,आणि बँकेचे पण नाव खराब होईल .त्यावेळी त्याने मला सांगितले की त्याने त्याचे ओळखीचे माणसांना हाताशी धरून दि.26 ऑक्टोंबर 2018 रोजी ते दि. 3 फेब्रुवारी 2020 रोजी पावेतो बँकेमध्ये धातूचे दागिने ठेवून ते सोन्याचे आहे ,असे भासवून त्यावर बँकेमध्ये सुमारे 44 सोनेतारण कर्ज प्रकरणे केलेले आहेत. त्यांनी माफी मागून बँकेची फसवणूक करून केलेल्या 44 सोनेतारण कर्ज प्रकरणांपैकी 6 प्रकरणांचे पैसे बँकेत भरले परंतु राहिलेले 38 प्रकरणांचे एकूण 22 20 300 रुपये भरले नाही. या बाबत मी वरिष्ठांना माहिती दिली दि. 7 मार्च 2020 रोजी बँकेचे अंतर्गत लेखा परीक्षण करण्यासाठी बँकेचे अधिकारी श्री शैलेश सोनटक्के आले असताना, 38 सोनेतारण कर्ज प्रकरणातील सील बंद पाकिटे उघडली. व त्यांचे फेरमूल्यांकन करण्यासाठी अनिल एम वाघाडकर व्हॅल्यूअर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी नियुक्त केलेले व्हॅल्यूअर श्री राहुल डहाळे यांनी नियुक्त केलेले व्हॅल्यअर श्री भारत कमलाकर नवघरे यांना सांगितले असता 38 प्रकरणातील सोनेतारण कर्ज प्रकरणातील तारण ठेवलेले दागिने हे सोन्याचे नसल्याचे निष्पन्न झाले तसेच श्री लक्ष्मीकांत भानुदास देडगावकर यांनी सदर 38 कर्ज प्रकरणातील दिलेल्या इस्टिमेशन स्लीप खोट्या व बनावट असल्याचे निष्पन्न झाले. प्रकाराबाबत मी तोफखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज देऊन कळविले होते व सदर अर्जाचे चौकशी करून लक्ष्मीकांत देडगावकर याने जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ची फसवणूक केली आहे त्याचेवर त्वरित कार्यवाही करावी. लक्ष्मीकांत देडगावकर व अन्य 24 जणांनी संगनमताने धातूचे दागिने खरे सोन्याचे आहेत अशा प्रकारचे बनावट प्रमाणपत्र तयार करून बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून बनावट दागिन्यांवर वेगवेगळे 38 सोनेतारण कर्ज प्रकरणे करून बँकेकडून 22 20 300 रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली म्हणून वरील आरोपी विरोधात माझी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड चे वतीने फिर्याद देत आहे असेही फिर्यादीत म्हटले आहे. 


No comments:

Post a Comment