लिंबेनांदुर येथे उपसरपंचानी केली फवारणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 16, 2020

लिंबेनांदुर येथे उपसरपंचानी केली फवारणी

लिंबेनांदुर येथे उपसरपंचानी केली फवारणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः शेवगाव तालुक्यातील लिंबे नांदुर येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच रंभाजी बुधवंत यांनी स्वतः गावातील सर्व परिसरात ट्रॅक्टरने सोडीयम हायड्रोकलोराईड ची फवारणी केली.
याबाबत सविस्तर असे की, शेवगाव तालुक्यात लिंबे नांदुर या ठिकाणी कोरोना पेशंट आढळून आले असता,परिसरातील गावातुन बंद पाळण्यात आले. स्वतः उपसरपंच बुधवंत यांनी ग्रामस्थ, ग्राम.कमीटी,आपत्ती व्यवस्थापन समिती,आरोग्य खात्याचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, समतादुत, पो.पाटील, ग्रामसेवक, तलाठी,यांचे सहकार्याने फवारणी करून, गावातील नागरिकांचे शरीरातील तापमान तपासणी मोहीम राबवली.उपसरपंचानी गावातील ग्रामस्थांनी विनाकारण रस्त्यावर फिरकू नये, कामाशिवाय घराच्या बाहेर पडु नये, स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, सर्वात मोठी आनंदी बातमी की, गावातील कोरोना पेशंट च्या कुटुंबातील सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे असे यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment