आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये ग्रामस्थांना आर्सेनिक गोळ्यांचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 4, 2020

आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये ग्रामस्थांना आर्सेनिक गोळ्यांचे वाटप

आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने आदर्शगाव  हिवरेबाजारमध्ये ग्रामस्थांना आर्सेनिक गोळ्यांचे वाटप

नगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पारनेर विधानसभा मतदार संघात आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या पुढाकाराने नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांच्या वाटपाचे उपक्रम सुरु आहे. नुकतेच आदर्शगाव हिवरे बाजार येथील ग्रामस्थांना होमिओपॅथीचे आर्सेनिक गोळ्याचे वाटप झाले.
यावेळी आमदार निलेश लंके, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, होमिओपॅथी तज्ञ डॉ.प्रमोद लंके आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने संपुर्ण पारनेर विधानसभा मतदार संघात सुरु असलेले होमिओपॅथीचे आर्सेनिक गोळ्या वाटपाचे उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. आमदार निलेश लंके यांनी सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू माणून विकासात्मक व आरोग्याच्या दृष्टीकोनाने कामे चालू आहेत. कोरोनाला न घाबरता त्याचे संक्रमण रोखण्यासाठी पुरेपुर उपाययोजना करुन व नियमांचे पालन करुन ही महामारी हद्दपार करण्याचे आवाहन केले.

होमिओपॅथी तज्ञ डॉ.प्रमोद लंके यांनी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक गोळ्या उपयुक्त ठरत असल्याचे सांगून, आर्सेनिक गोळ्यांची माहिती दिली. तर रोग प्रतिकारशक्ती वाढविणे व कोरोनाच्या बचावासाठी उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment