प्रभाग 8 हा विकासाचा मॉडेल ठरेल : नगरसेवक शाम नळकांडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 10, 2020

प्रभाग 8 हा विकासाचा मॉडेल ठरेल : नगरसेवक शाम नळकांडे

प्रभाग 8 हा विकासाचा मॉडेल ठरेल : नगरसेवक शाम नळकांडे 

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः कल्याणरोड व वारुळाचा मारुती परिसर अनेक वर्षांपासून विकासकामांपासून वंचित आहे. या भागात मोठी नागरी वसाहत आहे. या भागातील नागरिकांचे मुलभूत प्रश्नांपासून विकासकामे करायची आहेत. प्रभाग क्र. 8 हा बराचसा भाग शेती व उपनगराचा परिसर आहे. या भागाच्या विकासासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. या निधीसाठी महापालिका व राज्य सरकारकडे आम्ही चारही नगरसेवक  पाठपुरावा करत आहोत.
प्रभागामध्ये आता मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. वारुळाचा मारुती परिसरातील विविध रस्त्यांची कामे मंजूर आहेत. ती लवकरच सुरु होतील. प्रभागाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकासकामांतून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. पुढील काही वर्षात विकास कामांतून कल्याणरोड परिसराचा कायापालट केला जाईल आणि विकासाचा मॉडेल म्हणून कल्याण रोडची ओळख निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन नगरसेवक अप्पा नळकांडे यांनी व्यक्त केले.

अनिल बोरुडे म्हणाले की, प्रभागाच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.महापालिकेच्या माध्यमातून या भागातील विविध विकासकामे मंजूर आहेत. ते टप्प्याटप्प्याने प्रभागात सुरु होतील. नागरिकांना विश्वासात घेऊन विकासकामे केली जाणार आहेत, असे ते म्हणाले.

संजय शेंडगे म्हणाले की, प्रभाग 8 हा विस्ताराने खूप मोठा परिसर आहे. या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात शेती आहे.त्यामुळे मुलभूत प्रशश्नांपासून विकासकामे सुरु करावी लागत आहे. प्रभागातील सर्व विकास कामे मार्गी लागतील, असा विश्वासत्यांनी व्यक्त केला.

सचिन शिंदे बोलताना म्हणाले की, प्रभागातील सर्व विकासकामे दर्जेदार व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.नागरिकांनी या विकासकामांकडे लक्ष द्यावे, पुन्हा पुन्हा ती विकासकामे करण्याची वेळ येऊ नये आणि दर्जेदार कामांमुळे जनतेच्या पैशाचा योग्य वापर होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष असेल. प्रभागातील विकासकामांचे नियोजन करुन आम्ही चारहीनगरसेवकांनी विकासकामांचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार विकासकामे मार्गी लागतील.

वारुळाचा मारुती, राजमाता जिजाऊनगर, नालेगाव परिसरातील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक शिवाजी वाघ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगरसेवक अप्पा नळकांडे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, मा. नगरसेवक संजय शेंडगे, अरूण म्हस्के, महादेव गुंजाळ, धर्माजी कदम, पांडुरंग अदापुरे, मधुकर ढोणे, रवींद्र नागूलपेल्ली, अशोक मुजमुले, सतीश रोहोकले, संतोष उगले, संजय कोतकर, किशोर वाघ, अर्जुन गुंजाळ, शिवाजी कदम, संजय उगले, सचिन वाघ, बबलू सानप, बाळासाहेब रोहोकले, दत्ता वाघ, रघुनाथ वाघ, विष्णू शेलार, पै. सुनील कदम, अर्जुन रोहोकले, जनाबाई जपे, मिलिंद जपे, राजू म्हस्के, योगेश म्हस्के, गंगाधर रोहोकले, बाळू वाघ, बाबासाहेब वाघ, सचिन वामन, गणेश वामन, किरण वामन, सुभाष रोहोकले, अशोक बोरकरे, बंडू रोहोकले, नंदू रोहोकले, चंदू रोहोकले, अनिल रोहोकले, लक्ष्मण रोहोकले, गणेश टोणे, कुलदीप टोणे, अरुण कदम, बलभीम कदम, राजू रोहोकले, गणेश घुगरे, मंगेश घुगरे, सुनील कांबळे, बन्सी कांबळे, लमनोज बोडखे, दत्ता सोनवणे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment