हा पैसा जनतेचा; त्याचा उन्माद करू नका! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 27, 2020

हा पैसा जनतेचा; त्याचा उन्माद करू नका!

हा पैसा जनतेचा; त्याचा उन्माद करू नका!
घनकचरा भ्रष्टाचार चौकशीसाठी उपोषण करण्याचा राठोड यांचा इशारा
नगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिवसेना पुराव्या सह नगरसेवकांच्या उपस्थित आपल्या कडे तक्रार करते.त्याची तुम्ही गंभीर दखल न घेता कसे घनकचरा भष्ट्राचारची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदारचे 60% बिल अदा करण्याचे निर्णय घेता.या पैसा जनतेचा आहे त्याचा उतमात करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आयुक्त आपल्या खालचे अधिकारी आपली दिशाभूल करून आपल्या पर्यंत खोटी माहिती देतात.त्यामुळे तुम्ही आडचणीत येताळ. जर तुम्ही भ्रष्टाचार लपवला तर आम्ही हा भ्रष्टाचार उघडकीस आणू आणि न्यायालयात न्यायाची मागणी करून दोषींवर गुन्हा दाखल करू. आठदिवसात आपण या भ्रष्टाचारची चौकशी करून दोषींवर कारवाई करा आणि घनकचर्‍यातील भ्रष्टाचारची चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेकेदारचे 30% च्या वर मनपाने बिल अदा करूनये.अन्यथा शिवसेना आयुक्तांच्या कार्यालयात उपोषण करणार.असा इशारा उपनेते अनिल राठोड यांनी आयुक्त श्रीकांत मायकरवार यांना दिला.

नगरशहरातील मनपामार्फत उचला जाणारा घनकचर्‍याचा मध्ये होणार्‍या भ्रष्टाचार बाबत शिवसेनेने 10 दिवसांपूर्वी पत्र दिले होते. त्याबद्दल कोणतेही उत्तर मनपाने दिले नाही आणि घनकचरा उचलणार्‍या ठेकेदाराचे बिल काढण्याची ठरवले असे कळताच याबाबत विचारणा करण्यासाठी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेतली.यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते,युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर,नगरसेवक अमोल येवले,संतोष गेनाअप्पा,आनंद लहामगे,गौरव ढोणे,मनीष गुगळे,विशाल वालकर,मंदार मुळे सह शिवसैनिक व डॉ.बोरगे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment