कल्याण रोडवरील खूनाचे गूढ उकलले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 23, 2020

कल्याण रोडवरील खूनाचे गूढ उकलले

कल्याण रोडवरील खूनाचे गूढ उकलले
‘डीएनए’द्वारे प्रेताची ओळख, आरोपीकडून गुन्ह्याची कबुली


 

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः 18 एप्रिल रोजी कल्याण हायवेवरील नेप्ती शिवारातील पुलाच्या मोरीत कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या अनोळखी पुरुषाच्या प्रेताचे गुढ उकळले असून रघुनाथ  बर्डे वय 35 रा.नालेगाव असे मयताचे नाव असून त्याची पत्नी नंदा बर्डे हिने प्रेत पाहून तिचा पती रघुनाथ असल्याबाबत शंका व्यक्त केली होती.पण पोलिसांनी मयत व पत्नी नंदाचे डीएनए सॅम्पल घेऊन मयत हा नंदाचा पती असल्याचे सिद्ध करून या खुनाचे गूढ उकलले. बुरुडगाव येथील मच्छिंद्र म्हस्के हा मयत रघुनाथ बर्डे याचेबरोबर नेप्ती शिवारात दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यास विश्वात घेतल्यावर रघूला रोडच्या पुलाखाली असलेल्या मोरीत गळा दाबून मारल्याची कबुली दिली. यावरून मच्छिंद्र  म्हस्के वय 48 वर्षे वर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण हायवेवरील नेप्ती शिवारातील रोडच्या पुलाखाली मोरीत एक कुजलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुष जातीचे प्रेत सापडल.े त्या ठिकाणी तात्काळ नगर तालुका पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत यांनी भेट देऊन प्रेताची पाहणी करून तात्काळ परिस्थिती गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक नगर यांना फोन द्वारे कळविले. माननीय पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी नगर विभाग यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरील प्रेताची व घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. त्यानंतर सदरचे अनोखी पुरुष जातीचे प्रेम सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे पाठविण्यात आले. नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला. तपासात नंदा रघुनाथ बर्डे वय 35 वर्षे धंदा घरकाम रा. नालेगाव तिचे पती घरातून निघून गेल्याचे समजले त्यावरून तिला सदरचे प्रेत दाखविण्यात आले. नंदा बर्डे हिने प्रेत पाहून तो तिचा पती रघुनाथ एकनाथ बर्डे असल्याबाबत शंका व्यक्त केली.प्रेतावर पीएम करण्यात आले. पीएम नोट्समध्ये डॉक्टरांनी प्रेताचा गळा दाबून  मृत्यू झाला आहे .असा अभिप्राय दिल्याने नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला. मयताची डी.एन.ए सॅम्पलींग करण्यात आली.गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आली. त्याप्रमाणे सपोनि शंकरसिंह राजपूत व त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना राजपूत यांना गुप्त बातमीदारांना मार्फत समजले की, बुरुडगावात राहणारे मच्छिंद्र बाबुराव म्हस्के हा मयत रघु बर्डे याचे सोबत नेप्ती शिवारात दिसला होता. त्याशिवाय इतर दृष्टिकोनातून सुद्धा तपास करण्यात आला. मच्छिंद्र बाबुराव म्हस्के वय 48 वर्षे धंदा हॉटेल कामगार रा. नेप्ती शिवार अहमदनगर यास  विश्वासात घेऊन वारंवार त्याचेकडे बारकाईने विचारपूस केली असता. त्याने कबूल केले की रघुला त्याने पुलाखाली असलेल्या मोरीत गळा दाबून मारले आहे. त्यामुळे मच्छिंद्र बाबुराव म्हस्के वय 48 या गुन्ह्यात अटक करण्यात आली आह.े सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह पोलीस अधीक्षक सागर पाटील नगर तालुका पोलीस स्टेशन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील यांचे मार्गदर्शनाखालीतपासी अंमलदार शंकर सिंह राजपूत व त्यांचे पथकातील नगर तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक रितेश राऊत उपनिरीक्षक धनराज जारवाल पोहे कोण बापूसाहेब रावसाहेब खेडकर अशोक मरकड राहुल शिंदे बाळू कदम प्रमिला गायकवाड ज्ञानेश्वर खेळ धर्मराज दहीफळे तसेच कोणी पवार पाटील व त्यांच्या पथकच्या मदतीने करण्यात आलेली आहे.


No comments:

Post a Comment