घराघरातून दुमदुमला ‘जय भिम’चा गजर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 15, 2020

घराघरातून दुमदुमला ‘जय भिम’चा गजर

                                                       घराघरातून दुमदुमला ‘जय भिम’चा गजर
                              वंचित आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी घरतच साजरी केली आंबेडकर जयंती
अहमदनगर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आवहानाला प्रतिसाद देत पदाधिकार्यांनी घरीच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. केडगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे शहर युवक जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदिवे यांनी घरा मध्ये कुटुंबीयांसह आंबेडकर जयंती साजरी केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कुटुंबीयांनी भिम वंदना सादर करुन, जय भीमचा गजर केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यघटनेचे पालन करीत नागरिकांनी घरातच थांबण्याचे आवाहन सागर भिंगारदिवे यांनी केले. 

No comments:

Post a Comment