निघोज नागरी पतसंस्थेच्यावतीने किराणा मालाचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 10, 2020

निघोज नागरी पतसंस्थेच्यावतीने किराणा मालाचे वाटप

                                                   निघोज नागरी पतसंस्थेच्यावतीने किराणा मालाचे वाटप
नगरी दवंडी /प्रतिनिधी

निघोज ः  सध्या देशात चालु असलेल्या कोरोना साथीमुळे शासनाने केलेल्या संचारबंदी काळात गावातील गोरगरीब नागरीकांचे हातावर पोट असलेल्या कुटुंबासाठी निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने तांदुळ, साखर, तेल,तुरडाळ, रवा,  साबण,तसेच शौकत मोमीन (कोहीनुर सुपर मार्केट) यांचे वतीने 3 किलो गहु आटा इत्यादी वस्तुचे  शंभर पॅकेट गावातील रहिवाशी कुटुंबासाठी  वाटप करण्यासाठी श्री विनायक निंबाळकर (कामगार तलाठी) यांचेकडे देण्यात आले व मुलिकादेवी विदयालयामध्ये बाहेरगावातील असणार्‍या 1े4 नागरीकांना जेवणासाठी वेळोवेळी लागणार्‍या भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येईल असे संस्थेचे चेअरमन मा. श्री वसंत कवाद यांनी सांगीतले. यावेळी पारनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री विजयकुमार बोत्रे साहेब निघोज गावचे  सर्कल श्री. दत्तात्रय शेखरकर, कामगार तलाठी श्री विनायक निंबाळकर, पारनेरचे पोलिस निरीक्षक बोत्रे साहेब, संस्थेचे मुख्य कार्यकारी श्री दत्तात्रय लंके, आधिकारी श्री शांताराम सुरकुंडे, श्री सुनिल तांबे, श्री रामदास गाडीलकर, श्री संदीप गाडे, श्री भगवान श्रीमंदीलकर (पत्रकार), श्री विलास हारदे, निघोज पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल श्री अशोक निकम दादा व स्टाप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment