आमदार नीलेश लंके यांनी भागवली मुक्या प्राण्यांची भूक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 24, 2020

आमदार नीलेश लंके यांनी भागवली मुक्या प्राण्यांची भूक

आमदार नीलेश लंके यांनी भागवली मुक्या प्राण्यांची भूक

नगरी दवंडी /प्रतिनिधी
पारनेर ः कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता व या जैविक युद्धाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजना व या जैविक विषानुचा प्रतिकार करण्यासाठी सरकारने ठरवून दिलेल्या सर्व आटी व नियमांचे पालन करत पारनेर नगर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांचा कनवाळू व साधेपणा व समाजासाठी झोकुन देत दिन रात्र समाजाची सेवा करणारा एक सामान्य आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. 
माझ्या मतदार संघात एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही असे वारंवार सांगत, गेले अनेक दिवस शासनाच्या सर्व नियमाचे पालन करत मतदार संघातील गावोगावी किराणा वाटप, भाजीपाला वाटप व अन्नछत्राच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी मतदार संघातील व मतदार संघाच्या बाहेरील हजारो उपाशी जनतेस अन्नदान करत आहेत.

लॉक डाऊन असल्यामुळे पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या येथील माता दर्याबाई व वेल्हाबाई या जागृत देवस्थान असणार्‍या मंदिर परिसरात शेकडो माकडांवर उपासमारीची वेळ आली आहे. मानवता हाच धर्म हे ब्रीद सांभाळणार्‍या आमदार लंके यांच्या लक्षात हा प्रकार आला असता त्यांनी तात्काळ त्यांचे सहकारी असणारे डॉक्टर कावरे, राजुशेठ खोसे, श्रीकांत चौरे, निलेश आढाव, अमोल दळवी, अनिल सूर्यवंशी यांच्या मदतीने फळे घेऊन जात सर्व मुक्या प्राण्यांना स्वतःच्या हाताने पोटभर फळे खाऊ घातली.

No comments:

Post a Comment