जास्तीत जास्त गरजुंपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न ः कदम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 18, 2020

जास्तीत जास्त गरजुंपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न ः कदम

                                     जास्तीत जास्त गरजुंपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न ः कदम
शिवसेना, समझोता तरुण मंडळ व राजे ग्रुपच्यावतीने 1500 परिवारांस जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
नगरी दवंडी /प्रतिनिधी

अहमदनगर ः सध्या जगभर कोरोना विषणूने थैमान घातले आहे. देशात व राज्यातही या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आहे, त्यामुळे सर्वच उद्योग-धंदे बंद आहेत. रोजदारी व हातावर पोट असणार्या लोकांचे मात्र यामुळे प्रचंड हाल होत आहेत.  अशा परिस्थितीत शासनाच्यावतीने मदत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नगर शहरात  शिवसेना, समझोता तरुण मंडळ व राजे ग्रुप यांच्यावतीने 1500 परिवारास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिली.
या जीवनावश्यक वस्तूंमध्ये  गहू, तांदूळ, तेल,साखर आदि वस्तूंचे पिशव्या तयार करण्याचे काम सुरु आहे. यासाठी  शहर बँकेचे संचालक व समझोता मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कदम, सोनू सैदाने, रवी वडे, रवि साळवे, शरद सौदागर, आदिंसह मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. अधिक माहिती देतांना संभाजी कदम म्हणाले, गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचा काम-धंदा बंद पडला आहे. शहरातील अनेक लोक हे छोटे-छोट व्यवसायिक, कामगार, मजूर असल्याने त्यांचे दिवसभराच्या कमाईवरच घर चालते. परंतु अशा बंदच्या परिस्थितीमुळे त्यांना काम-धंद नसल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाहचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटूंबाला मदतीचा हात देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या जीवनावश्यक वस्तूंचे शहरातील गरजू लोकांना त्यांच्या प्रभागातील नगरसेवकांमार्फत पोहच केले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने जास्तीत जास्त गरजू कुटूंबापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संभाजी कदम यांनी सांगितले.

जसे लॉकडाऊन सुरु झाले आहे तशी गरजू कुटूंबाना मदत करण्यात येत आहे. त्यासाठी  मित्र परिवाराचे सहकार्य मिळत आहे. नागरिकांनीही  आवश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये, शासनाच्यावतीने वेळोवेळी दिलेल्या सूचना व अटींचे पालन करावे, असे आवाहन केले.

No comments:

Post a Comment