शहरात कोणीही उपाशी राहणार नाही घाची दक्षता घेऊ : जाधव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 10, 2020

शहरात कोणीही उपाशी राहणार नाही घाची दक्षता घेऊ : जाधव

                                   शहरात कोणीही उपाशी राहणार नाही घाची दक्षता घेऊ : जाधव


नगरी दवंडी /प्रतिनिधी
अहमदनगर ः देशावर कोरोना संसर्ग विषाणूचे संकट आल्यामुळे मानवी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच त्यांच्या आरोग्यावर या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहेत. या उपाययोजनांना नागरिकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. नगर शहरामध्ये जिल्हा प्रशासन व अहमदनगर महानगरपालिका आपल्या परीने कामे करत आहेत.
मनपाचे उपायुक्त सुनील पवार यांनी जनतेच्या मुलभूत सोयीसुविधेसाठी हेल्पलाईन सुरु केले आहे. नगरकरांनी त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. गरजूंना महापालिकेच्या माध्यमातून नक्कीच याचा जास्तीत जास्त उपयोग होईल याची काळजी घेत आहे. साई द्वारका सेवा ट्रस्टने वर्षेनुवर्ष सामाजिक बांधिलकीतून गोरगरिब जनतेला मदतीचा हात देण्याचे काम करत आहे. या विषाणूचे आपल्यावर आलेले संकटामध्ये गरजूंवर उपासमारीची वेळ आली आहे.
यासाठी शहरातील गरजू व गोरगरिब जनतेला खाद्य पदार्थ पुरविण्याचे काम गेली 15 दिवसांपासून सुरु आहे. आज मनपा हेल्पलाईनला 100 फूड पाकीट देण्याचे काम आम्ही केले असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केले.
कोरोना विषाणूच्या संकटकाळात गरजूंना व गोरगरिब जनतेला साई द्वारका सेवा ट्रस्टने मदतीचा हात देण्याचे काम करत आहे. महापालिकेला 1000 खाद्य पदार्थाची पाकिटे पालिकेचे शशिकांत नजन यांच्याकडे देताना अध्यक्ष धनंजय जाधव. समवेत राहुल मुथा, विनोद बोगा, सचिन दिवाणे, ज्ञानेश्वर दौंडकर, सोनू बोरुडे, दिनेश लल्ला आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, संकटाच्या काळामध्ये प्रत्येकाने माणुसकीचा हात देण्याचे काम केले पाहिजे. संतांच्या शिकवणीनुसार प्रत्येकाने माणुसकी दाखवून कोणीही उपाशी राहणार नाही, याची पूर्णत: दक्षता घ्यावी. साई द्वारका सेवा ट्रस्टने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत आहे. साईचरणी अशीच प्रार्थना करतो की, देशावर आलेले संकट लवकरात लवकर दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

यावेळी मनपा अधिकारी शशिकांत नजन म्हणाले की, साई द्वारका सेवा ट्रस्टने नेहमीच जनतेप्रती आपले प्रेम दाखवून दिले आहे. आजही त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी जनतेला आधार देण्याचे काम करत आहे. इतर संस्थांनी साई सेवा ट्रस्टसारखे पुढे येऊन गरजूंना मदत करावी. महापालिकेने मदतीचा हात देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. यासाठी जास्तीत जास्त नगरकरांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment