भाळवणीत शालेय विद्यार्थ्यांना धान्याचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 10, 2020

भाळवणीत शालेय विद्यार्थ्यांना धान्याचे वाटप

                                                भाळवणीत शालेय विद्यार्थ्यांना धान्याचे वाटप
भाळवणी ः कारोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. अशा परिथितीत जि.प.प्रा.शाळा धोत्रे बुः केंद्र भाळवणी शाळेत शालेय विद्यार्थ्यांना शिल्लक तांदूळ व धान्यादी मालाचे वाटप करण्यात आले. कोरोना मुळे सद्या शाळा बंद असल्याने शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र साळवे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब धांबोरे, गावचे सरपंच नंदकुमार भांड, यांनी शासनाच्या आदेशानुसार तांदूळ वाटण्याचे नियोजन केले. मुख्याध्यापक साळवे सर यांनी शाळेतील पालकांच्या ग्रुपवर मेसेज टाकून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे ची माहिती पालकांना दिली. शाळेत फक्त मुलांच्या पालकांनीच गर्दी न करता रांगेत तोंडाला रूमाल किंवा मास्क बांधून शिस्तबद्ध पणे प्रत्येकामध्ये तीन मीटर अंतर ठेवून यायचे. बरोबर आवश्यक पिशव्या सांगितल्या. गर्दी होऊ नये म्हणून गेटमधून एकालाच सोडण्यात आले. तीन मीटरवर गोलाकार वर्तुळे आखण्यात आली. रांगेत गोलावर ऊभे राहूनच सर्वांनी शिस्तबद्ध माल घेतला.मुख्याध्यापक साळवे सरांसह शाळेतील शिक्षक भनगडे सर, झावरे व महाले मैडम पालकांनी सहकार्य केले. या कार्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment