बनावट दारु कारखान्यावर छापा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 16, 2020

बनावट दारु कारखान्यावर छापा

                                            नामांकीत कंपन्यांच्या नावाचे स्टीकर बनविले
                                                    बनावट दारु कारखान्यावर छापानगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः नगर जिल्हयातील पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 5 लाख 91 हजार 700 रुपये किंमतीचा बनावट दारु कारखान्यावर छापा टाकून, त्या ठिकाणावरुन बनावट दारु बनवण्यासाठी येणारे साहित्य-मशनरी जप्त केले आहे. तसेच एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीवरुन पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगावचे शिवारात समर्थनगर भागामध्ये प्रशांत हॉटेलचे पाठीमागे विजय बाबुराव आव्हाड (रा.जांभळी, ता.पाथर्डी) हा त्याचे मालकीचे घरामध्ये स्वत:चे फायद्यासाठी अनाधिकृतपणे वेगवेगळया प्रकारचे केमीकल वापरुन त्यापासुन मशीनचे  सहायाने बनावट दारु तयार करुन ती बाटल्यामध्ये भरुन, त्या बाटल्यास वेगवेगळया नामांकीत कंपन्यांचे बनावट लेबल लावुन मशीनचे सहाय्याने बाटल्या सिल करुन सदर दारुची चोरुन विक्री करीत आहे अशी माहिती खबर्या मार्फत मिळाली होती. त्यानुसार पथकातील पोलिसांनी छापा टाकल्यावर त्यातील आरोपीने त्यांचे नांव विजय बाबुराव आव्हाड (रा.जांभळी, ता.पाथर्डी) असे सांगितले. या ठिकाणी वेगवेगळ्या नामांकित कंपन्याचे लेबल लावलेल्या बाटल्या आणि बाटल्याचे झाकण मिळून आले.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉस्टेबल मनोहर गोसावी, पोलिस नाईक भागीनाथ पंचमुख, दिनेश मोरे, रविंद्र कडीले, संतोष लोढे, विनोद, मासाळकर, संदिप चव्हाण, मच्छिद्र बडे, रोहीदास नवगीरे यबन बेरड, देवीदास काळे, पाथर्डी पो.स्टे. येथील सपोनि दिलीप राठोड, सफौ. खाटीक, पोहेको अरविंद चव्हाण यांना मदतीस घेवुन दोन पंचासह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावुनकेली आहे.

No comments:

Post a Comment