राज्यात ऑपरेशन ‘कमळ’ची तयारी? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 5, 2019

राज्यात ऑपरेशन ‘कमळ’ची तयारी?

राज्यात ऑपरेशन ‘कमळ’ची तयारी?
भाजपाचे 40 आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात?





नगरी दवंडी प्रतिनिधी

मुंबई (प्रतिनिधी)ः उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून भारतीय जनता पक्षाची कोंडी करण्याची पावले ते उचलत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे भाजपास कसे हैराण करता येईल यांची व्युहनिती आखात असताना भाजपातील नाराजांना भडकविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. उद्धव ठाकरेंचा या प्रयत्नाला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ऑपरेशन ‘कमळ’ म्हणून हिरवा कंदील दाखविला असल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करून विजयी झालेले आमदारांशी संपर्क साधला गेला आहे. यासाठी केंद्रातील काही नेते मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. सध्या भाजपात कार्यरत असलेले पण नाराज असणारे भाजपा नेते हेही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्याच्या संपर्कात असल्याचे महाविकास आघाडीच्या गोटातून सांगण्यात आले.
कर्नाटकातील काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याच्या मोहिमेला ऑपरेशन ‘लोटस’ असे नाव दिले गेले होते. आता भाजपा आमदार फोडण्याचा प्रक्रियेला ‘ऑपरेशन कमल’ असे नाव देण्यात आले आहे. राजीनामा देऊन पुन्हा पोटनिवडणूक लढविण्याच्या सूचना भाजपच्या काही आमदारांना देण्यात येत आहेत. पण या आमदारांना पुन्हा निवडूण येण्याची शक्यता वाटत नसल्यामुळे त्यांनी यास नकार दिला असल्याचे समजते. त्यामुळे भाजपचे नाराज असलेले व पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आमदार आसा एकत्र आकडा 40 च्या पुढे आहे. तो पक्षांतर्गत कायद्यात बसू शकतो. आगामी काळात म्हणजे हिवाळी अधिवेशनानंतर ‘ऑपरेशन कमळ’ला आकार दिला जाणार असल्याची माहिती आतील सूत्रांकडून देण्यात आली आहे.
भाजपाला खिंडार पाडण्याची जबाबदारी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने भाजपाच्या एका खासदारावर सोपविली असून ऑपरेशन कमळ चे मुख्य जनक नाथाभाऊ खडसे आहेत की काय याबाबत माहिती मिळू शकली नाही पण खडसेंच्या हालचालीकडे भाजपा श्रेष्ठींनी लक्ष केंद्रीत केले आहे. 

काल प्रमुख ओबीसी नेत्यांनी खडसे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनाही खडसेंना शिवसेनेत प्रवेश देऊन मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत असण्याची माहिती मिळत आहे. परंतु खडसे असे काही करतील, असे वाटत नाही.

No comments:

Post a Comment