कोयत्याचा धाक दाखवून सावेडीत दोघांना लुटले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 26, 2019

कोयत्याचा धाक दाखवून सावेडीत दोघांना लुटले

कोयत्याचा धाक दाखवून सावेडीत दोघांना लुटले


अहमदनगर : लघुशंका का केली? अशी विचारणा करुन दोन जणांना सावेडी भागातील मॅक्सकेअर हॉस्पिटल ते कृषी कार्यालयादरम्यान कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले. ही घटना रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून समजलेली हकिगत अशी की, गणेश राधाकिसन भुस्सा(रा. भिंगारदिवे मळा, भुतकरवाडी, सावेडी)व त्यांचा मित्र रविवारी रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान मॅक्सकेअर हॉस्पिटलजवळ लघुशंकेसाठी काही वेळ थांबले होते. त्यावेळी तीन जण तेथे आले व त्यांनी तुम्ही तेथे लघुशंका का केली? असे बोलून दमदाटी केली. त्यावेळी हे दोघेही माफ करा, चुकले असे म्हणून पुढे गेले. ते थोडे पुढे जात नाहीत तोच पाठीमागून विनानंबरच्या दुचाकीवरुन तीन जणांनी त्यांचा पाठलाग करुन पेट्रोलपंपाजवळ तुम्ही लघुशंका का केली? असे म्हणून कोयत्याचा धाक दाखवून त्यांचेजवळील बॅगमधील 26 हजार 500 रुपये रोख व 30 हजार रुपयांची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली.
नंतर तिघेही दुचाकीवरुन पसार झाले. गणेश भुस्सा यांनी याबाबत तोफखाना पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी  अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र पिंगळे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment