टायगर अभी जिंदा है - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 24, 2019

टायगर अभी जिंदा है

टायगर अभी जिंदा है 
पवारांच्या त्या एका सभेमुळे खरचं ‘वारं फिरलं

राज्यतील विधानसभा निवडणुकीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. एकीकडे विधानसभेचे चुरस सुरु असतानाच सातार्‍यामध्ये लोकसभेच्या पोट निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला जोरदार झटका दिला आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला आहे. 95 हजारहून अधिक मतांनी राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विजयी झाले आहेत. मी स्वत: सातार्‍यामध्ये जाऊन तेथील जनतेचे आभार मानणार आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, 18 तारखेला शरद पवार यांनी सातार्‍यामध्ये घेतलेल्या सभेमुळे राष्ट्रावादीला मोठा फायदा झाल्याचे मत अनेक राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

विधानसभेच्या निवडणूक प्रचार संपण्यासाठी 24 तासांहून कमी वेळ शिल्लक असताना शुक्रवारी रात्री शरद पवारांनी सातार्‍यामध्ये सभा घेतली. राष्ट्रवादीच्या या सभेमध्ये तुफान पाऊस पडला. शरद पवार भाषण करत असतानाच मुसळधार पाऊस कोसळू लागला. पाऊस पडत असतानाही पवार थांबले नाही आणि त्यांनी आपले भाषण सुरुच ठेवले. पवारांचा भर पावसात भाषण देतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले. शनिवारी सकाळपासूनच डहरीरवझरुरी हा हॅशटॅग ट्विटवर पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसला. देशभरातील अनेक नेटकर्‍यांनी ट्विटवरुन पावसात उभ राहून भाषण देण्याच्या पवारांच्या या राजकारणावरील आणि आपल्या कामावरील निष्ठेला सलाम केल्याचे पहायला मिळाले. याच सभेमुळे ‘आमचं ठरलयं.. वारं फिरलयं’ असं म्हणत राष्ट्रवादीच्या समर्थकांनी पवारांच्या या सभेचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केले. याच सभेचा फायदा राष्ट्रवादीला झाल्याचे बोलले जात असून अनेकजण पवारांचा पावसात उभं राहून भाषण देतानाचा व्हिडिओ पाहून भावूक झाल्याचे पाहयला मिळाले

No comments:

Post a Comment