सोशल मीडियावर 25 लाखाची लॉटरी फसव्या मेसेजचा धुमाकूळ. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 27, 2022

सोशल मीडियावर 25 लाखाची लॉटरी फसव्या मेसेजचा धुमाकूळ.

 सोशल मीडियावर 25 लाखाची लॉटरी फसव्या मेसेजचा धुमाकूळ.

नमस्कार मी फिल्मस्टार अमिताभ बच्चन यांच्या ऑफिसमधून बोलतोय.


नगरी दवंडी/अविनाश निमसे

अहमदनगर ः नगर शहरासह जिल्ह्यात ऑनलाईन फसवणूकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी हे सायबर गुन्हेगार निरनिराळ्या क्लुप्त्या लढवत आहेत. सोशल मीडियाच्या फसव्या मॅसेजने सध्या सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.  त्यास अत्तापर्यंत  बरेच जण बळी पडले आहेत तर अनेकांनी बदनामीच्या भीतीने पोलीस ठाण्यात तक्रार करणे टाळले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील अनेक जण बळी पडण्याची शक्यता असली तरी अत्तापर्यंत सुशिक्षित लोकंच जास्त प्रमाणात फसल्याचे समोर आले आहे. नमस्कार मी फिल्मस्टार अमिताभ बच्चन यांच्या ऑफिस मधून बोलतोय आपला मोबाईल नंबर ऑल इंडिया सिम कार्ड कॉम्पिटिशन लकी ड्रॉ द्वारे सिलेक्ट झाला असून या नंबरवर आपल्याला 25 लाखांची लॉटरी लागली आहे. अशा मेसेज द्वारे नागरिकांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.
व्हाट्सअपवर आलेला एक अनोळखी नंबर व त्यामध्ये पाठवलेली ’कौन बनेगा करोड पती’  द्वारा आयोजित लकीड्रॉचे माहीतीपत्रक व त्याविषयी माहीती सांगणारे 1 मिनिट 47 सेकंदाची कॉल रेकॉर्डिंग...अन यातूनच क्षणात होत्याचे नव्हते होत आहे. मागच्या महिन्यात शहरातील रामवाडी परिसरातील एकाला 1 लाख 33 हजार 200 रुपयांना गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच ग्रामीण भागातील अनेकांना केबीसीच्या नावाने फसवे मॅसेज येत आहेत. साकतखुर्द ( ता. नगर ) येथेही तीन ते चार जणांना हे फसवे मॅसेज आले आहेत. यात पाच रुपयांच्या लिंकनेही भरीत भर घातली असून नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सोशल मीडियावर जनजागृतीसाठी एक पोस्ट टाकली असून 2अशा लिंक ओपन करू नये असे आवाहन केले आहे. ऑनलाईन फसवणुकी मध्ये ग्रामीण भागातील  नागरिकांना याचा जास्त धोका असून स्मार्टफोन वापरणार्‍यांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तीने पाठविलेल्या लिंक्स ओपन अथवा डाउनलोड करू नये, तसेच फोन, ईमेल्स, फ्रेंड रिकवेस्ट यांना प्रतिसाद देऊ नये. लॉटरी लागल्या बाबतच्या पोस्ट आल्यास त्यावर विश्वास ठेऊ नये. - स.पो.नि. राजेंद्र सानप, नगर तालुका पोलीस ठाणे

सायबर गुन्हेगार अजमावतात विविध फंडे
  ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे नागरिकांना लुबाडण्यासाठी निरनिराळे फंडे अजमावत आहेत.  यामध्ये महागडे कुरियर, हनीट्रॅप, घर बसल्या पैसे कमवा, पीएफ फंड दोन दिवसात मिळवा, लोनचे हप्ते स्थगित करा, नौकरी मिळवा, फ्री मोबाईल डेटा, आदी प्रकारांशी सबंधित लिंक सायबर गुन्हेगारांकडून पाठवल्या जातात. या लिंकवर क्लिक करताच बँक खात्यातून क्षणात पैसे गायब होतात.

काय आहे  1 मिनिट 47 सेकंदाची रेकॉर्डिंग
  नमस्कार मी विजयकुमार, फिल्मस्टार अमिताभ बच्चन यांच्या ऑफिस मधून बोलत आहे. आपला  मोबाईल नंबर ऑल इंडिया सिम कार्ड कॉम्पिटिशन लकी ड्रॉ द्वारे सिलेक्ट झाला असून या नंबरवर आपल्याला 25 लाखांची लॉटरी लागली आहे. हा लकी ड्रॉ फिल्मस्टार अमिताभ बच्चन, पंतप्रधान नरेंद्र, मुकेश अंबानी यांच्या द्वारे घेण्यात आला आहे. आपण कोण बनेगा करोडपती मध्ये विजेता झाले असून आपण 25 लाख जिंकले आहेत. जर आपल्याला 25 लाख मिळवायचे असतील तर आपल्याला पाठविलेल्या लॉटरीच्या फाईल वर सर्व माहीती दिली आहे. त्यावरच लॉटरीचा नंबर व लॉटरीचे वरिष्ठ अधिकारी राणा प्रताप सिंग यांचा व्हाट्सअप नंबर दिला आहे. या नंबर व्हाट्सअप वर ऍड करून त्यावर व्हाट्सअप कॉल करून त्यावर आपल्या लॉटरी विषयी सर्व माहिती मिळेल.

No comments:

Post a Comment