शिवजयंती दिवशी 19 फेब्रु.ला राज्यस्तरीय महापौर चषक स्पर्धेचे आयोजन - महापौर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 12, 2022

शिवजयंती दिवशी 19 फेब्रु.ला राज्यस्तरीय महापौर चषक स्पर्धेचे आयोजन - महापौर.

 शिवजयंती दिवशी 19 फेब्रु.ला राज्यस्तरीय महापौर चषक स्पर्धेचे आयोजन - महापौर.

अहमदनगर महानगरपालिका सायकल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दि. 19 फेब्रुवारी रोजी ‘राज्यस्तरीय महापौर चषक’ सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या स्पर्धेचा शुभारंभ होणार असून महानगरपालिकेपासून मुख्य स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास 30,000 रुपये व चषक द्वितीय ते 20 क्रमांकापर्यंत वेगवेगळ्या गटात सुमारे 1 लाख 65 हजार रुपयांचे पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेमध्ये राज्यातील नामवंत सायकलपटू सहभागी होणार आहेत. अशी माहिती महापौर रोहिणी शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पुष्पा बोरुडे यांनी सांगितले, वसुंधरा अभियानांतर्गत आम्ही मनपाच्यावतीने प्रथमच राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करत आहोत. या स्पर्धेत संपुर्ण राज्यातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होणार आहेत. याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, राज्यस्तरीय सायकल स्पर्धेची सुरुवात मनपापासून होणार असून, यावेळी महापौर, आयुक्त, सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांच्या उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचा मुख्य मार्ग हा महानगरपालिका -शेंडी - जेऊर - पांढरीपुल - घोडगाव मार्गे वडाळा पर्यंत राहणार आहे. तसेच पुन्हा वडाळा ते नगर या दिशेने परत फिरेल व औरंगाबाद रोडवरील एन.आर.लॉन येथे स्पर्धेचा समारोप करण्यात येऊन पारितोषिक वितरण होईल. या स्पर्धेतील घाटात प्रथम येणार्या स्पर्धकास ‘घाटाचा राजा’ या पुरस्काराने गौरविण्यात येईल. याप्रसंगी प्रा.संजय साठे म्हणाले, सायकलिंग असो. ऑफ महाराष्ट्राच्या नियमानुसार ही स्पर्धा फक्त महाराष्ट्रातील सर्व पुरुष स्पर्धकांसाठी खुली असून, अहमदनगर शहराबाहेरील स्पर्धकांची शनिवार दि.18 फेब्रुवारी रोजी निवास व भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका गुरुवार दि.17 पर्यंत स्वीकारण्यात येतील. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क वा नोंदणी शुल्क असणार नाही. सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर प्रवेशिका लिंक उपलब्ध आहे. (लूलश्रळपसरीीेलळरींळेपेषारहरीरीहीींर) नोंदणी व अधिक माहितीसाठी मानद सचिव  प्रा.संजय साठे मो.7385081270 किंवा सचिव प्रताप जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
यावेळी महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, संतोष गेनप्पा, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे राज्य सचिव प्रा.संजय साठे, क्रीडा विभागाचे व्ही.टी.फिलिप्स, प्रताप जाधव, साईनाथ थोरात, राजेश लयचेट्टी, राजेंद्र नराल आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment