आमदारांनी ‘छत्रपतीं’च्या पुतळ्यासमोर दंडवत खालून माफी मागावी- आगरकर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 8, 2022

आमदारांनी ‘छत्रपतीं’च्या पुतळ्यासमोर दंडवत खालून माफी मागावी- आगरकर.

 आमदारांनी ‘छत्रपतीं’च्या पुतळ्यासमोर दंडवत खालून माफी मागावी- आगरकर.

राष्ट्रवादी आमदारांसह आयोजकांवर गुन्हा दाखल करा- लोढा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा चांगलाच वादात सापडलाय. शिवसेना, काँग्रेस, मनसे यांनी या कार्यक्रमावर टीका केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षही या वादात उतरला असून भाजपच्या वतीने आज एक पत्रकार परिषद घेऊन भाजपचे वसंत लोढा आणि अभय आगरकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका करत आमदारांनी नागरकरांनी दिशाभूल केली असल्याची टीका केली आहे या कार्यक्रमात डीजे वर हिडीस गाणे लावून सुमारे तीन तास रोड बंद ठेवला आणि महापालिका प्रशासनाने या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यासाठी निधी दिला आणि आमदारांनी राष्ट्रवादीचा कार्यक्रम घेतला. आमदारांसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वसंत लोढा यांनी केली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर साष्टांग दंडवत घालून माफी मागावी अशी मागणी अभय आगरकर यांनी केलीय.
अहमदनगर शहरात नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नुतनीकरण करून लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला मात्र हा सोहळा आता वादात सापडला आहे. शिवसेनेने या लोकार्पण सोहळ्यावर टीका करत आमदार संग्राम जगताप यांनी हा कार्यक्रम हायजॅक केल्याचं आरोप केला होता त्या पाठोपाठ कांग्रेसचे शहर अध्यक्ष किरण काळे यांनी या कार्यक्रमात चित्रपटातील गाणे लावून नाच केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याने आमदारांनी महाराजांच्या पुतळ्या समोर नाक रगडून माफी मागावी अशी मागणी केली होती. तर मनसेने राष्ट्रवादी सह शिवसेना वर टीका करत दोघे एकाच माळेचे मणी असल्याची टीका केली आहे.
या घटनेची निंदा करावी तेवढी कमी असून लता मंगेशकर यांच्या निधनाने दुखवटा असताना कार्यक्रम होतो आणि नाच गाणे होतात ये निंदनीय असून या पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी  प्रा. भानुदास बेरड यांनी केलीय.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here