पोलिसांनी जप्त केलेल्या डिझेलची पोलिसांकडूनच चोरी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 12, 2022

पोलिसांनी जप्त केलेल्या डिझेलची पोलिसांकडूनच चोरी.

 पोलिसांनी जप्त केलेल्या डिझेलची पोलिसांकडूनच चोरी.

दोन पोलिसांवर गुन्हा दाखल, तीन जण फरार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पाथर्डी : पोलिस ठाण्याच्या परिसरात जप्त करून ठेवलेल्या एका टँकर मधून बायोडिझेल चोरी करताना थेट पोलिसाला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. ही घटना घडल्यानंतर आज संपूर्ण पाथर्डी शहरात या घटनेबाबत चांगलीच चर्चा सुरू आहे. थेट पोलिसच या गुन्ह्यात आरोपी झाल्याने कुंपणच शेत खात असल्याने विश्वास कोणावर ठेवायचा अशी उपरोधीक चर्चाही पाथर्डीत सुरु आहे
या बाबत हकीकत अशी की जानेवारी महिन्यात दोन बायोडिझेल टँकरवर पोलिसांनी कारवाई करत टँकर जप्त केले होते हे टँकर पाथर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करण्यात आले आहेत. गुरुवारी पहाटेच्या दरम्यान पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणार्‍या ठाणे अमंलदार पोलिस नाईक ईश्वर रघुनाथ गर्जे आणि पोलीस कर्मचारी किरण बडे यांना पोलीस स्टेशन च्या आवारातून काही आवाज ऐकू आला. एवढ्या पहाटे पोलिस स्टेशनच्या आवारात काय आवाज येतो हे पाहण्यासाठी दोघे आवाजाचा कानोसा घेत परिसरात चक्कर मारत असताना पोलिस ठाण्याच्या आवारात लाईट बंद करून जप्त केलेल्या टँकर शेजारी अजून एक टँकर उभा असलेला दिसला व जप्त केलेले टँकर मधून मशीनच्या साहाय्याने बायोडिझेल त्या टँकरमध्ये चोरी करून भरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गर्जे यांनी यावेळी त्या ठिकाणी असलेल्या तीन अज्ञात इसमांना याबाबत विचारले असता त्यांनी ईश्वर गर्जे आणि किरण बडे यांना धक्काबुक्की करून पळण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यापैकी एकाला पोलिसांनी ओळखले असल्याने पोलिसांनी याकृत्यामधे सहभागी असणार्‍या एका पोलिस नाईक असणार्‍या भागवत चेमटे व दिपक शेंडे यांना ताब्यात घेतले आहे.तर इतर तीन जण फरार झाले आहेत. या सर्वांवर पोलीस ठाण्याच्या आवारातून जप्त केलेल्या टँकरमधील बायोडिझेल चोरणे, सरकारी कामात अडथळा आणणे, धमकी देणे अशा विविध कारणावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात असिफ रफिक शेख रा.पाथर्डी, दिपक आरोळे (पुर्ण नाव माहीत नाही) हे दोघे जण फरार आहेत.

No comments:

Post a Comment