नथुराम गोडसेंवरील चित्रपटाचा वाद पेटला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 21, 2022

नथुराम गोडसेंवरील चित्रपटाचा वाद पेटला.

 नथुराम गोडसेंवरील चित्रपटाचा वाद पेटला.

व्हाय? आय किल्ड गांधी..

खा. अमोल कोल्हेंना पवारांचं समर्थन, काँग्रेसचा विरोध.
महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही- नाना पटोले.


मुंबई ः
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांना थहू ख घळश्रश्रशव ॠरपवहळ या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी खा. कोल्हें यांची पाठराखण केली आहे तर नथुराम गोडसे यांची भूमिका साकारणार्‍या खासदार अमोल कोल्हे यांना काँग्रेसने थेट इशारा दिला आहे. ’व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले यांना म्हटलं आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही अमोल कोल्हेंच्या या भूमिकेचा विरोध केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हेंची पाठराखण केली असून कलाकार म्हणून त्यांनी ती भूमिका केली असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
अमोल कोल्हे हे लोकप्रतिनिधी असल्याने गोडसेंना हिरो बनवण्याचं काम करू नये. याबाबत शरद पवारांनी लक्ष घालावं असंही पटोले म्हणाले आहेत. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत कलाकार नाहीत, विशेष करुन गोडसे विचाराला ताकद मिळणं म्हणजे देशविघातक विचारांना ताकद मिळण्यासारखं आहे. अशा प्रवृत्तीला हिरो बनवण्याचं काम जर होत असेल तर ते चुकीचं आहे. या देशाला फक्त महात्मा गांधी यांचा विचारच तारू शकतो, आणि हा देश जागतिक महासत्ता होऊ शकतो, हे सातत्याने सिद्ध झालं आहे. गोडसे प्रवृत्तीन देश फुटेल आणि म्हणून अशा विघातक विचारांना हिरो बनवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यांचा आम्ही निषेध करतो असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
गांधी सिनेमा संपूर्ण जगात गाजला होता. त्या चित्रपटातही कोणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका ज्याने केली तो कलाकार होता, तो काही नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका करत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावं लागेल, असं शरद पवार म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारीत चित्रपटात एखाद्या अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका केली म्हणजे तो मुघल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. कलावंत म्हणून तो भूमिका घेतो. किंवा रामराज्यासंबंधी सिनेमा असेल तर त्यात राम आणि रावण यांच्यातील संघर्ष दाखवला असेल तर तर रावणाची भूमिका करणारी व्यक्ती रावण असू शकत नाही. एक कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे.

No comments:

Post a Comment