मोठा आवाज करणार्‍या बुलेट वाहनांवर वाहतूक शाखेची कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 25, 2021

मोठा आवाज करणार्‍या बुलेट वाहनांवर वाहतूक शाखेची कारवाई.

 मोठा आवाज करणार्‍या बुलेट वाहनांवर वाहतूक शाखेची कारवाई.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ‘बुलेट’ ही दुचाकी वापरणार्‍यांची शहरात मोठी संख्या आहे. इतर दुचाकी वाहनांपेक्षा बुलेट वापरत असणार्‍यांचा रूबाब काही औरच असल्यामुळे बुलेटचे देखणेपण अधिक प्रभावी करण्यासाठी कंपनीचा सायलेंसर काढून मोठा सायलेन्सर टाकण्यावर भर दिला जात आहे. मोठ्या सायलेन्सर मोठा आवाज निघत आहे. या मोठ्या आवाजाकडे रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष खेचले जाते. बुलेटचा मोठा आवाज येण्यासाठी सालन्सरमध्ये बदल करणार्‍या बुलेटसह इतर वाहनांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई केली आहे. 24 दिवसांमध्ये एकुण 30 बुलेटवर कारवाई करण्यात आली.
फॅन्सी नंबर, विनानंबरच्या 216 दुचाकीवर कारवाई करत 83 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख चौकांमध्ये दररोज सायंकाळी चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान नाका बंदी करून ही कारवाई करण्यात येत आहे. बुलेट या दुचाकीचा मोठा आवाज येण्यासाठी सालन्सरमध्ये बदल केला जात आहे. कंपनीने दिलेला सालन्सर काढून मोठा सायलन्सर टाकला जातो. त्यामुळे मोठा आवाज येतो. अशा स्वरूपाच्या बुलेटवर कारवाई करण्यात आली आहे. बुलेटसह वाहतूक नियमानुसार नंबर नसलेल्या, विना नंबरच्या दुचाक्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच करोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येत आहे.
अहमदनगर शहर वाहतूक शाखेकडून फॅन्सी नंबर, विना नंबरसह वाहतूकीचे नियम मोडणार्‍या सर्व वाहनांवर कारवाई सुरू आहे. बुलेटचा मोठा आवाज येण्यासाठी सालन्सरमध्ये बदल करणार्या बुलेट दुचाकीवर कारवाई करण्यात येत आहे. असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment