श्रीगोंद्याच्या माजी नगराध्यक्ष श्यामला ताडेंची आत्महत्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 20, 2021

श्रीगोंद्याच्या माजी नगराध्यक्ष श्यामला ताडेंची आत्महत्या

 श्रीगोंद्याच्या माजी नगराध्यक्ष श्यामला ताडेंची आत्महत्या


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा शहराच्या माजी नगराध्यक्ष श्यामला ताडे (वय वर्षे 40) यांनी राहत्या घरामध्ये आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राहत्या घरामध्ये गळ्याभोवती साडी गुंडाळलेला वर फॅनला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. किरण दगडू ताडे (वय वर्ष 43) यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला या घटनेबाबत माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार श्यामला ताडे या श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये अडीच वर्ष नगराध्यक्ष पदावर कार्यरत होत्या. अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षित जागेवर त्या निवडून आल्या होत्या. सदरील घटना धनश्री अपार्टमेंट श्रीगोंदा येथे त्यांच्या राहत्या घरात घडली आहे. पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांनी या घटनेनंतर अकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस कर्मचारी खारतोडे हे तपासी अधिकारी आहेत. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment