आ. रोहित पवारांची अनिल कचरेंनी केली पोलखोल. राष्ट्रवादीकाँग्रेस कडून दमदाटी! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, December 17, 2021

आ. रोहित पवारांची अनिल कचरेंनी केली पोलखोल. राष्ट्रवादीकाँग्रेस कडून दमदाटी!

 आ. रोहित पवारांची अनिल कचरेंनी केली पोलखोल. राष्ट्रवादीकाँग्रेस कडून दमदाटी!

भाजपा उमेदवाराच्या पतीचा व्हिडीओ व्हायरल
कर्जत ग्रामपंचायत निवडणूक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः कर्जत ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी भाजपा उमेदवारांवर दबाव आणून त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास लावलेल्या माजी भाजपा मंत्री राम शिंदे यांचे आरोपांना आत्ता पुष्टी मिळत आहे. कर्जत नगर पंचायत निवडणुकीत जोगेश्वरवाडी प्रभागाच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या रणकंदना मध्ये तेथील उमेदवाराचे पती अनिल कचरे यांच्या व्हिडीओने कर्जतचे राजकारण ढवळून निघाले असून कचरे यांची उमेदवारी दबावाने काढून घेऊन आपला उमेदवार बिनविरोध करण्यासाठी आ रोहित पवार यांनी आटापिटा केल्याच्या प्रा राम शिंदेच्या आरोपाला पुष्टी मिळाली असून यावर लोकशाहीचे  गोडवे गाणारे आ. रोहित पवार काय उत्तर देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्जत नगर पंचायत निवडणुकीत आ रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते दडपशाही करत आहेत, आमिष दाखवत आहेत, असा गंभीर आरोप भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे यांनी केला असून अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्र 2 च्या भाजपाच्या उमेदवार सौ नीता अजिनाथ कचरे व त्याच्या जाऊबाई पूजा अनिल कचरे यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. मात्र शेवटच्या तासाभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या या दोन्ही महिला उमेदवारांना आणले व अर्ज माघारी घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पुढे उभे केले. यावेळी मोठा गोंधळ झाला, निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशासनावर भाजपाने आक्षेप घेत पवारांच्या दबावाला प्रशासन साथ देत असल्याचा आरोप केला. मात्र या गोंधळाच्या वातावरणात या दोन्ही ही महिलांनी आपले अर्ज मागे घेतले.  
यानंतर आ. रोहित पवार यांनी आपण लोकशाहीला मानणारे आहोत, कचरे यांनी घरगुती अडचणीमुळे माघार घेतली मी त्यांच्याशी कधीही संपर्क केला नाही असे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. याशिवाय माजी नगरसेविका नीता कचरे यांनी ही अशाच पद्धतीने मनोगत देऊन  आपली बाजू मांडली. मात्र त्याच्या दुसर्‍याच दिवशी भाजपाने दुसर्‍या क्रमांका ची उमेदवारी दिलेले पूजा अनिल कचरे यांचे पती अनिल कचरे यांनी आम्ही भाजपाला मानणारे आहोत, प्रा राम शिंदे यांनी आमचे गोरगरीब जनतेचे अनेक कामे केली आहेत. भाजपाचे आमच्यावर खूप उपकार आहेत मात्र अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आमच्या घरी येऊन महिलांना दमदाटी करून त्याच्या कुटुंबियांना काही कळू दिले नाही व एक दोन कारणे सांगत आमचा अर्ज काढून घेतला असे निवेदन व्हिडीओ द्वारे प्रसिद्ध केले आहे, या खुलाश्याने आ. रोहित पवार यांचा लोकशाही मानण्याचा दडपशाही केली नसल्याचा दावा फोल ठरला असून कर्जत शहरात विकासाचे राजकारण करण्याचा दावा ठोकणारे पवार यांचे अनेक पत्ते उलटे पडत आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघात त्यांची भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्याशी संघर्ष होत असतो. सध्या कर्जत नगरपंचायतीसाठी दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 21 डिसेंबर रोजी कर्जत नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून शहरातील विविध समाजघटकांशी संवाद साधत आहेत. कधी ते बाजारात जाऊन भाजी विक्रेत्यांच्या गाठी भेटी घेत आहेत. तर अनेक ठिकाणी कापड दुकानात, तर कधी रस्त्यावरील पाणीपुरीच्या ठेल्यावर कार्यकर्त्यांसोबत पाणीपुरीची टेस्ट घेतली. तसेच कर्जतमध्ये प्रचारानिमित्त कुंभार गल्लीत गेले असता काही बांधव संक्रांतीसाठी बोळके बनवत होते. रोहित पवार यांनीही त्या फिरत्या चाकावर चिखलाला आकार देऊन बोळके निर्मितीचा विलक्षण अनुभव घेतला. एका सलूनच्या दुकानात कटिंग देखील त्यांनी केली. त्याचबरोबर एका कार्यकर्त्याच्या टेम्पोचे पूजन करुन त्यांची राईड मारली. विद्यार्थ्यांना अंतराळाबाबत रुची निर्माण व्हावी यासाठी ’सफर अंतराळाची’ हा उपक्रम सुरू करण्यात आला.यावेळी शाळेत विद्यार्थ्यांसोबत या उपक्रमाचा शुभारंभ केला. तर काही वेळ हॉलीबॉल खेळण्याचा आनंद घेतला. त्यांच्या या हटके प्रचाराची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे. कर्जत शहरात विविध भागात व्यावसायिकांची आणि नागरिकांच्या घरी जाऊन ते भेट घेत आहेत. नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ज्या विकासाचा कार्यक्रम घेऊन लढत आहे, याबाबतची माहिती यावेळी त्यांना दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here