विक्रम राठोड धमकी प्रकरण गंभीर ः किरण काळे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 25, 2021

विक्रम राठोड धमकी प्रकरण गंभीर ः किरण काळे.

विक्रम राठोड धमकी प्रकरण गंभीर ः किरण काळे.

तपासासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांना धमकीचे पत्र शिवालयावरती आले होते. याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देखील दाखल केली आहे. मनपा पोटनिवडणुकीतील नाट्यमय घडामोडींनंतर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह थेट शिवालय गाठत विक्रम राठोड यांची भेट घेवून काँग्रेस आपल्या पाठीशी असल्याचे राठोड यांना सांगितले. हे प्रकरण गंभीर असून याबाबत लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची मी काँग्रेस पदाधिकार्‍यांसह समक्ष भेट घेणार असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी पोलिसांकडे करणार असून केडगाव दुहेरी हत्याकांडाची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेण्याची व सतर्कता पाळण्याची गरज असल्याचे काळे म्हणाले.
विक्रम राठोड यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगात काँग्रेसने उतराई होत राठोड यांच्या मदतीला धावून येण्याची भूमिका घेतली आहे. यावेळी विक्रम राठोड व किरण काळे यांच्यामध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. यावेळी मनपा पोटनिवडणूकीवर देखील चर्चा झाल्याचे समजते. यावेळी काळे म्हणाले की, विक्रम राठोड हे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. ते शिवसेनेचे नेते आहेत. स्व.अनिलभैया राठोड यांचे रक्त त्यांच्यामध्ये आहे. अशा गोष्टींना ते कदापि भीक घालणार नाहीत.
विक्रम राठोड, स्व.अनिलभैय्या यांच्या विचारांनी चालणारी शिवसेना तसेच मी व माझे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नगर शहरातील नागरिकांना सुरक्षा देण्याच्या दृष्टीने अशा दहशतीच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत असतो असेही काळे म्हणाले.
यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, शहर जिल्हा क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, शहर जिल्हा महासचिव इमरान बागवान आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment