ना. धनंजय मुंढेची आ.रोहित पवारांवर स्तुतीसुमने.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 18, 2021

ना. धनंजय मुंढेची आ.रोहित पवारांवर स्तुतीसुमने..

 ना. धनंजय मुंढेची आ.रोहित पवारांवर स्तुतीसुमने..

मोठ्या कुटुंबातील लेकरु तुम्हाला आपलं वाटतंय हा खरा विश्वास.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः सध्या इंडीची किंमत आमच्या शेतकर्‍याच्या खिशातील बिडीच्या किंमती पेक्षा कमी झाली आहे. नगर पंचायतीच्या निवडणुकीमधून कार्यकर्त्याना मोठे करण्याची ही निवडणूक आहे, दुष्काळाच्या काळात रोहित पवार यांनी पाणी देण्याचे काम केले. ज्याकडे त्यावेळच्या मंत्र्याचे लक्ष नव्हते, मोठ्याच्या कुटुंबातील लेकरू असलं तरी ते तुम्हाला आपलं वाटतंय हा खरा विश्वास आहे. नगर पंचायतीच्या रूपाने तो पुन्हा दाखवून द्या विश्वास बसणार नाही असा विकास करून दाखवू असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांनी व्यक्त केला आहे.कर्जत येथे नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या  उमेदवारांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंढे यांनी बोलताना सभेला कोठून सुरू करू असे म्हणताना  संस्कृत मधील रोहितचा अर्थ सांगताना सूर्याची पुथ्वीवर पडते पहिली किरण ती म्हणजे रोहित असे म्हटले. यावेळी ओबीसींच्या प्रश्नावर केंद्रावर जोरदार टीका केली, कर्जतकरांनी रोहित पवार यांना निवडून दिले. दोन वर्षात कर्जतचे नाव गुजरात पर्यत पोहचले.आगामी तीन वर्षांत कर्जतचे नाव दिल्ली पर्यत धडकेल असेही मुंढे म्हणाले.
या सभेत आ. रोहित पवार यांनी बोलताना भाजपा सध्या अत्यंत खालच्या पातळीवर बोलत टीका करत असल्याचे म्हणत आमच्यावर बोलायला विषयच नसल्याचे म्हटले व विकासाच्या प्रश्नावर राम शिंदेनी समोरासमोर येऊन चर्चा करावी असे आवाहन दिले. तालुक्यात आरोग्य शिबिरे घेतली. शहरातील अनेक विषय आपण घेतले आहेत, पाणी विषयात 18 कोटीं मंजूर केले आहेत, कर्जत तालुक्यात मोठी एम आय डी सी करायची आहे. अशा प्रकारचा आपल्याला विकास करायचा आहे. गुजरात काँग्रेसचे प्रदेश कार्यअध्यक्ष हार्दिक पटेल यांनी बोलताना आम्ही गुजरात मध्ये चांगल्या चांगल्याला पाणी पाजले आहे हे तर कर्जत आहे. आ. रोहित पवार यांच्यामुळे कर्जतची ओळख निर्माण झाली आहे. ज्या गुजरात मॉडेलवर लोकांना भुलवल जातं त्याचे वास्तव सांगण्यासाठी मी आलो आहे. गेली दोन वर्षात 240 कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत, गुजरात मध्ये चोरांबरोबर लढताना 9 वर्ष तुरुंगवास ही भोगला आहे. महाराष्ट्र भूमीने कधी दिल्ली समोर डोके झुकवले नाही असे म्हणताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आम्हाला बदनाम करण्यासाठी सर्व प्रकारचे राजकारण केले जाते असे म्हणत कर्जतच्या शिपी आमटीचा उल्लेख करत विजय झाल्यानंतर मी पुन्हा येऊन आपल्याबरोबर शिपी आमटी खाणार असल्याचे म्हटले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रवीण घुले, नामदेवराव राऊत यांची भाषणे झाली. सभेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, आदीसह सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
चौकट 1 - भाजपाच्या प्रभाग 14 च्या उमेदवार शिबा तारेक सय्यद यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार ताराबाई कुलथे यांना जाहीर पाठिंबा दिला व राष्ट्रवादीत प्रवेश केला. ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीने हा भाजपाला दिलेला धक्काच असून यामध्यमातून कर्जतचे राजकारणात मोठी खळबळ माजली असून हा उलटफेर नक्कीच भाजपाला महागात पडू शकतो.

No comments:

Post a Comment